Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

बस थांबा नसल्यामुळे होतंय नागरिकांचे हाल

 मावळ जनसंवाद :- नाणे मावळ या भागात जांभवली, थोरण, शिरदे,पाले नामा, उकसान, सोमवडी,भाजगाव,कोळवाडी,गोवित्री, उंबरवाडी,करंजगाव,साबळेवाडी,मोरमारवाडी, कांबरे, कोंडीवडे,नाणे,नवीन  उकसान, नानोली, साई, वाऊड,कचरेवाडी, घोणशेत व इतर वाड्या वस्त्या आहे. नाणे मावळ, पवन  मावळ, आंदर मावळ यांचे  मध्यवर्ती व्यापारी पेठ व नाणे मावळातील शिक्षणाचे माहेरघर असलेल्या कामशेत शहरामध्ये येण्याजाण्यासाठी नाणे मावळमध्ये वाहतूक व्यवस्था सक्षम नाही. या मार्गावर एस टी च्या बसेस आहे पण त्या अपुऱ्या आहेत.  प्रवाश्यासाठी अनेक बस थांबाही नाही .काही ठिकाणी आहे तर काही नाहीतर काही  ठिकाणी तुटलेल्या अवस्थेत दिसून येत आहे. या कारणांमुळे एस टी च्या प्रवाशांना नाहक त्रास होत आहे.या ठिकाणी प्रवाशांना सुरक्षित असे वातावरण नाही.काही ठिकाणी प्रवासी हे पावसात भिजत बस वाट बघत् असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
              नाणे मावळातील नाणे, कांबरे , करंजगाव , मोरमारेवाडी , गोवित्री, उकसान, जांबवली, थोरण, वळवंती आदी गावातून अनेक लोक प्रवास करत असतात. नाणे मावळमध्ये वाडीवळे धरण, टाटा धरण , संत तुकाराम महाराज पादुका स्थान , कोंडेश्वर आदी धार्मिक व पर्यटन स्थळे आहेत. तसेच शाळा, पशुवैधकीय  दवाखाना, शाळा महाविद्यालय  आहे  या ठिकाणी प्रवास करताना नेहमीच खाजगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागतो. शिवाय त्यांचा  दर हि ए.स.टी महामंडळाच्या बसेसच्या फेऱ्या हया दुप्पट वाढवण्यात याव्यात. त्यातच खाजगी मोटार  सायकलने तीन सीट प्रवाशी घेऊन वाहतूक करतात. त्यामुळे एखादा गंभीर अपघात घडण्याची शक्यता आहे . या ठिकाणी प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो .
          कामशेत शहरातून उकसान व जांभवली या गावांसाठी एकच शटल बस असून ती कामशेत वरून उकसान साठी सकाळी ८ व ११ वाजता तसेच संध्याकाळी ५ वाजता जाते. जांभवलीसाठी सकाळी १० दुपारी २:४५ वाजता बस जाते.दोन्ही मार्गांसाठी एकच बस असल्यामुळे तिच्या फेऱ्या कमी होत आहे त्यातच या मार्गावरील एक दोन बस थांबे सोडले तर कुठेही प्रवाशांसाठी बस थांबा नाही .
               नाणे मावळात पर्यटन स्थळे इथे असल्यामुळे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना बस थांबा नेमका कुठे आहे हे कळत नाही.कामशेत शहरातून नाणे मावळातील पूर्वेकडील भाग म्हणजेच नानोली, साई, वाऊड,कचरेवाडी, घोणशेत  या गावांसाठी एस टी सुरू करावी अशी मागणी येथील नागरिक करत आहे  तसेच पश्चिमेकडील वाडीवळे , वळक, बुधवडी ,संगीशे, नसावे , खांडशी या गावातून प्रवास करणारा कामगार वर्ग मोठा आहे परंतु अद्याप इथेही ए.स. टी बस सेवा उपलब्ध झाली नाही अशी मागणी नागरिक करीत आहे.



                  कांब्रे -  कोंडीवडे ना.मा फाटा येथे बस थांब नसल्यानेे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना अथवा 
                                    प्रवाशांना तात्कळत उभे राहत असताना टिपलेला फोटो

Post a Comment

0 Comments