Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

नाणे मावळातील गावा गावात एन सनासुदीमध्ये अंधार

 मावळ जनसंवाद :- नाणे मावळातील गावा- गावांमधील एन सनासुदी मध्ये अंधाराचे साम्राज्य असल्याने या परिसरातीला नागरिक व वाहन चालक त्रस्त झाले असून, अंधरामुळे अपघात होत आहेत. येत्या काही दिवसात 
श्री.गणेश चतुर्थी (गणपती बाप्पा) चे आगमन होत आहे. या सणानिमित्त सर्वत्र उत्सवाचे वातावरण दिसत आहे मात्र नाणे मावळातील वाड्या वस्त्यामध्ये खेडेगावातील रस्त्यावर विधुत पोलावर ब्लब बंद आहेत. ब्लब बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळी वारंवार प्रघात होत असताना महावितरण प्रशासनाकडून दुरुस्ती दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसूत् आहे.
          तसेच श्री.क्षेत्र कोंडेश्वर् व इतर ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमुळे या रस्त्यावर सर्वाधिक वर्दळ असलेल्या या रस्त्यावरील अनेक दिवे बंद आहे. शिवाय वाड्या वस्ती मधील सुद्धा दिवे बंद आहेत त्यामुळे सर्वत्र अंधार अंधार पडला आहे. विद्युत पोलवरती ब्लब् बंद असल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे तसेच वारंवार अपघातांच्या घटनाही घडत आहेत त्यामुळे त्या ठिकाणी तातडीने ब्लब बसवावेत अशी मागणी परिसरातील  नागरिकांमधून होत आहे. त्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा सुज्ञ नागरिक व्यक्त करीत आहेत. परंतु याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.

Post a Comment

0 Comments