Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

कामशेत- जांभवली या रस्त्यावर कांब्रे- नाणेच्या हद्दीत वाढलेल्या झुडपांचा धोका

मावळ जनसंवाद :- कामशेत- जांभवली या रस्त्यावर  कांब्रे- नाणेच्या हद्दीत वाढलेल्या झुडपांचा धोका समोरचे वाहनच दिसत नसल्याने चालकांना गोंधळ; स्वचछतेची मागणी  होत आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या काही ठिकाणी तीव्र वळण व उतार आहे. या भागात रस्त्याच्या कडेला दुतर्फा झाडे-झुडपे वाढली आहेत. त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या  वाहन चालकांना समोरील वाहन दिसत नाही. त्यामुळे चालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. तसेच समोरील वाहनही दिसत नाही.त्यामुळे गेल्या काही दिवसापासून या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रस्त्याच्या  कडेला वाढलेली  झाडे-झुडपे काढली नाहीत तर मोठा अपघात होण्याची भीती कांबरे गावचे मा.सरपंच साईनाथ गायकवाड  यांनी व्यक्त  केली आहे.                                                                  नाणे मावळ या भागात जांभवली, थोरण, शिरदे,पाले नामा, उकसान, सोमवडी,भाजगाव,कोवाडी,गोवित्री,उंबरवाडी,करंजगाव,साबळेवाडी,मोरमारवाडी,कांबरे,कोंडीवडे,नाणे,नवीन उकसान, नानोली, साई, वाऊड, कचरेवाडी, घोणशेत व इतर वाड्या वस्त्या आहे. तसेच कामशेत शहरातून नाणे मावळातील पूर्वेकडील भाग म्हणजेच नानोली, साई, वाऊड,कचरेवाडी, घोणशेत  तसेच पश्चिमेकडील वाडीवळे, वळक , बुधवडी,संगीशे, नेसावे , खांडशी आदि अनेक गावे व वाड्या वस्त्या आहेत येथील नागरिकांनी झाडे- झुडपे काढण्यात यावी अशी मागणी नागरिक करीत आहे.



Post a Comment

0 Comments