मावळ जनसंवाद :- कामशेत पोलीस ठाण्यातील कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या कडून कौतुक व सन्मान करण्यात आला. कामशेत पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना देशमुख यांच्या हस्ते शनिवार दि.२७ रोजी विशेष पुरस्कार (प्रशस्तीपत्रक) देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.कामशेत पोलीस स्टेशन गु.र.न. ११७/२०२२ भारतीय दंड संहिता कलम ३०२,३७६,(२),(J)(L),३७६(A)३७६(AB),२०१ , बालकांचे लैंगिक अपराध पासुन सरक्षण अधिनियम २०१२चे कलम ३,४,५,५ (M) व ६ या गुन्ह्यातील अल्पवयीन पिडीत निर्भयाच्या खुनाचा संवेदनशील गुन्हा अवघ्या २४ तासात जेरबंद केले .या अती संवेदनशील गुन्हयातील आरोपींना अटक करुन विशेष कामगिरी केल्याबाबत कामशेत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय जगताप,उपनिरीक्षक शुभम चव्हाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अजय दरेकर, पोलीस हवालदार गणेश तावरे, पोलीस हवालदार जीतेंद्र दिक्षीत, पोलीस हवालदार रविंद्र राय, पोलीस नाईक अनिल हिप्परकर, पोलीस कॉन्स्टेबल आशिष झगडे यांना विशेष पुरस्कार (प्रशस्तीपत्रक) देऊन सन्मानित करण्यात आले.
0 Comments