Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

रानडुक्कर पासून शेतकऱ्याचे होतय नुकसान

मावळ जनसंवाद :- नाणे मावळातील कोंडिवडे ना.मा शेतकऱ्यांच्या उस पिकाची  धुडगूस घालून ऊस पिकाची मोठ्या प्रमानात नासधूस करून नुकसान केले. यामुळे शेतकरी वर्ग हतबल झाला असून नुकसान झालेल्या पिकांची  भरपाई द्यावी. अशी मागणी शेतकऱ्यामधून केली जात आहे. मावळ तालुक्यात ग्रामीण भागात सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. डोंगर भागामध्ये खाण्यासाठी अन्न मिळत नसल्याने  अन्नाच्या शोधात रानडुकरे  ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकामध्ये घुसून नासाडी करताना चित्र पहावयास मिळत आहे.  कोंडिवडे ना.मा या डोंगर भागात रानडुकरांचे प्रमाण जास्त असल्याने उभ्या असलेल्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. रानडुकरांच्या उपद्रवामुळे परिसरातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे.  
           मागील दोन तीन दिवसांपासुन डोंगर पायथ्याजवळील गावाच्या पश्चिमेकडील शेतकरी बांधवाच्या शेतात रान डुक्कर कळप आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  गावातील नागरिकांनी रात्रीच्या वेळी पूर्वेकडील भागात रान डुक्कर येत असल्याचे नागरिक सांगतात. शिवाय ही रान डुक्कर कळपाने येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांची नासधुस करतात.
संबधीत विभागाने शेतकर्यांचे पंचनामे करून त्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी. असी मागणी शेतकरी करीत आहेत. 
         प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करावी जेणेकरून शेतकरी बांधवाचे रानट्या प्राणी पासुन नुकसान होणार नाही. असे नागरिक सांगतात. 

प्रतिक्रिया  :-  शेतकरी मोठ्या मेहनतीने कष्टाने घाम गळून शेती पिकवत असतो.अशा अवस्थेत                     रान डुकरे पिकांची नुकसान करीत असेल तर  शेतकरी बांधवानी शेती कशी करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. वन विभागाने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई
देण्यात यावी असी माहिती  कोंडिवडे ना.मा येथील शेतकरी सखाराम नामदेव चोपडे  यांनी दिली. 

प्रतिक्रिया  :-  शेतकरी बांधवानी वन विभागाकडे लेखी अर्ज करावा. वनरक्षक मार्फत रीतसर ज्या ज्या शेतकरी यांचे नुकसान झाले असेल तर शेतकऱ्याच्या ऊस पिकांचा पंचनामा करून वनविभाग  मार्फत नुकसान भरपाई देण्यात येईल असी माहिती वनरक्षक श्री. डी.डी. उबाळे  यांनी दिली.  

 

Post a Comment

0 Comments