Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत एक दिवस शासकीय पाहणी

 मावळ जनसंवाद :-  माहिती अधिकार कार्यकर्ता एस आर गुजर यांनी दिलेल्या तहसिलदार साहेब मावळ यांना निवेदनानुसार दिनांक २२/७/२०२२ रोजी मा.मधुसूदन बर्गे साहेब तहसिलदार मावळ पुणे येथे यांचे माहिती अधिकार अधिनियम २००५ अ. दिनांक २२/७/२०२२ रोजी एक दिवशीय कामकाज पाहण्यासाठी अर्ज दिला होता. दिनांक ८/८/२०२२ रोजी तहसिलदार कार्यालय यांच्याकडून एकदिवसीय कामकाज पाहण्यासाठी पत्र मिळाले. व त्यामध्ये नमुद केले की दिनांक २२/८/२०२२ रोजी सकाळी ११.०० ते ५.०० पर्यंत उपस्थित राहून शासकीय वेळेत पाहू शकता. म्हणून मी आज रोजी ११ ते ५ या न्यायालयात सुनावणी  वेळेत उपस्थित राहून, सर्व संविधान मार्गानें लोकशाही पध्दतीने माहिती अधिकार अधिनियम कलमा अन्वये पालन करून पाहूनी केली. अनेक सुनवणी अनेक विषया अन्वये ३२- एम, कुळकायदा, कलम १५५, कलम १८५, देवस्थान इ. केसेचा खुप छान अनुभव घेतला. शेवटी ५ वाजता मा. मधुसूदन बर्गे साहेब तहसिलदार मावळ यांना माहिती अधिकार अधिनियम २००५ अ. माहिती अधिकार पॕकेट डायरी व एक मार्गदर्शक पुस्तिका दिली.अशी माहिती एस आर गुजर माहिती अधिकार कार्यकर्ते महासंघ महाराष्ट्र राज्य मावळ विभाग संघटक व माहिती अधिकार समिती पुणे मावळ सदस्य .





मा.मधुसूदन बर्गे साहेब तहसिलदार मावळ यांना माहिती अधिकार  पॕकेट डायरी व एक मार्गदर्शक पुस्तिका भेट देताना श्री.एस.आर.गुजर (महासंघ महाराष्ट्र राज्य मावळ विभाग संघटक व माहिती अधिकार समिती पुणे मावळ सदस्य).

Post a Comment

0 Comments