मावळ जनसंवाद :- नाणे मावळातील गावांना एन सणासुदीच्या काळात विजेचा महावितरणच्या निष्काळजी पणामुळे वारवार खंडित वीज पुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. विजेच्या लपंडावाने नागरिक आणि व्यावसायिक हैरान झाले आहेत. सध्या मोहरम, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, स्वतंत्र दिन, श्रीकृष्ण जयंती, गोपाळकाला हे सन तोंडाव आले आहे. या निमित्त खेडेगावात अनेक विविध कार्यक्रम खेळले जातात. मात्र अचानक अर्धा ते एक तास विजपुरवता मागील काही दिवसापासून होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. तसेच नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. वीज बिले नियमित भरून हि वीजपुरवठा सुरळीत नसतो. दिवसातून पाच ते सात वेळा वीजपुरवठा खंडित केला जातो. असी तक्रार नागरिक करतात. काही महिन्यापूर्वी नाणे मावळातील काही गावांमधील नागरिकांना तेथील रोहित्र जळल्यामुळे अंधारात राहावे लागले. वेळोवेळी नागरिकांनी पाठपुरावा करून रोहित्र बसविण्यात आले.पण हाउस बंद पडले होते. त्या वेळी एन भात रोपांना पाण्याची गरज असताना इंजन वापरावे लागले होते. नाणे मावळातील नागरिकांच्या विजेच्या समस्या कोण सोडवणार असा प्रश्न विचारला जात आहे. काही दिवसांपासून वारंवार विजपुरवता खंडीत होत आहे. येत्या सणासुदीच्या काळात या भागात वीजपुरवठा सुरळीत करावा .त्यासाठी महावितरण यांनी आवश्यक उपाय योजना त्वरित कराव्यात अशी मागणी नागरिक करीत आहे.
0 Comments