मावळ जनसंवाद :- नाणे मावळात सणासुदीला इलेक्ट्रॉनिक वस्तूनी बाजारपेठ सजली आहे. कामशेत. लोणावळा, टाकवे बु, उर्से, अदी बाजारपेठेमध्ये व इतर शहरतील बाजारपेठ इलेक्ट्रानिक वस्तूंची खरेदीसाठी खेडेगातील ग्राहकांची गर्दी होत आहे. मागील वर्षी कोरोना असल्याने तसेच इतर परिस्थितीमुळे बाजारपेठ मंदावली होती. मात्र यंदा परतीचा पाऊसाने चांगला हात देल्याने बाजारपेठत उत्साहाचे वातावरण आहे.यंदाच्या सणासुदीमध्ये गोपाळकाला, श्रीकृष्ण जयंती,आदि सण आहे. तसेच काही दिवसावर श्रीगणेश जयंती, येत आहे. या सणांच्या मुहर्ता वर इलेक्ट्रानिक वस्तूंची खरेदी शहरातील ग्राहक, व खेडेगावातील ग्राहक मोठ्या प्रमाणात करीत आहे. या दिवशी प्रामुख्याने टीव्ही, फ्रीज, संगणक, वासिंग मशीन, मिक्शर अदि इलेक्ट्रानिकस वस्तूंची खरेदी केली जाते. त्यातही ग्राहक वस्तूंची कंपनी पाहून वस्तूंची खरेदी करीत आहे. तसेच विक्रेत्याकडून VARNTI, GRANTI, ऑफर, वस्तूचे फिचर्स आदि बाबत ग्राहक चौकसपणे माहिती घेत आहे. एलईडी टीव्हीला सर्व इलेक्ट्रानिक वस्तू मध्ये जास्त मागणी आहे. यंदा कोरोनाचे कोणतेही निर्बंध नाही. तसेच पाऊस चांगला झाल्याने ग्रामीण भागामध्ये आंनदाचे वातावरण आहे. शिवाय नव नवीन इलेक्ट्रानिक वस्तू बाजार उपलब्ध होत आहे. तसेच ह्या वस्तू स्वस्त असल्याने ग्राहक घेण्यासाठी आग्रही असतात. अशी माहिती श्री.अनिल शिंदे अदिती इलेक्ट्रानिक कामशेत यांनी माहिती दिली.
0 Comments