मावळ जनसंवाद :- कांब्रे ना.मा.ग्रामपंचायत अंतर्गत कोंडीवडे येथील पानंद रस्त्यावरील ओढा अतिवृष्टीमुळे दुरावस्थेत झाल्याने ग्रामस्थांना, शालेय विद्यार्थ्यांना येण्या जाण्यास मोठी कसरत करावी लागत आहे.मागील काळात 3 वर्षापूर्वी या ओढयाचे काम झाले होते.अतिशय निकृष्ट दर्जाचे काम केल्याने आज हा प्रसंग निर्माण झाल्याचे माजी उपसरपंच श्री.गणपत दाभणे यांनी सांगितले. ग्रामपंचायत सदस्य श्री.स्वामी गायकवाड यांनी पाहणी करताना ह्या कामाचे इस्टीमेट पाहुन चौकशी करणार, तसेच असे काम करणाऱ्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करणार, या ओढ्याची दुरुस्ती ग्रामपंचायतद्वारे लवकरात लवकर करून पुढील काळात याठिकाणी पक्के बांधकाम करुन देऊन हा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यात येणार असल्याचे श्री.स्वामी गायकवाड यांनी सांगीतले. यावेळी ग्रामसेवक श्री.चव्हाण भाऊसाहेब, श्री.नवनाथ गायकवाड,श्री.सुरेश भांगरे उपस्थित होते.
0 Comments