Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

प्युज खराब झाल्याने विधूत पुरवठा होतय खंडीत

 मावळ जनसंवाद :- नायगाव येथील मरिमाता मंदिराच्या आवारात महावितरणाचे विधुत डीपीमधील प्युज खराब झाल्याने विधूत पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. डीपीजवळून सतत नागरिक जात असतात.त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो.विधूत डीपीत केवळ वायर जोडल्या आहेत. पावसामुळे जमिनीवर साचणाऱ्या पाण्यात विधूत प्रवाह उतरून दुर्घटना घडू शकते. विधूत दाब सतत कमी-जास्त होत असल्याने विजेवर चालणा-या घरगुती वस्तू खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. दिवस रात्रीचा विजेचा लपंडाव सुरूच असतो अशी परीस्थिती असताना याकडे महावितरणाचे कर्मचारी लक्ष देण्यास तयार नाही. महावितरणची डीपी ही रस्त्या बसुन काही अंतरावर असल्याने ह्याच रस्त्यावरून जनावरे, वाहने,विद्यार्थी ये-जा करतात. शिवाय डीपी हे जमिनीपासून चार फुट अंतरावर तसेच त्या पेक्षा कमी असल्याने सहजा सहजी स्प्रश होऊ शकतो.त्यामुळे मनुष्य व प्राणी यांची हानी होवु शकते. विधूत समस्या संदर्भात महावितरणला वारंवार लेखी व तोंडी सांगूनही कोणत्याच प्रकारची दखल घेतली जात नाही. अशी तक्रार नायगाव गावातील नागरीक करीत आहे.विधूत समस्या संदर्भात वारंवार सांगूनही कोणत्याच प्रकारची दखल घेतली जात नाही.अशी तक्रार ग्रामस्थ करीत आहे. प्रशासनाने तत्काळ विधूत डीपीला नवीन प्युज बसविण्यात यावे अशी मागणी नागरिक करीत आहे.                                                                                                      प्रतिक्रिया:- नायगाव येथील मरिमाता मंदिराच्या आवारात विधूत डीपी प्युज खराब झाल्याने दिवसातून अनेक वेळा विधूत पुरवता खंडित होतो. असे असताना महावितरण विभागाला वारंवार लेखी अथवा तोंडी सागुनही लक्ष देण्यास तयार नाही.अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते गजानन वावरे यांनी दिली.

           


Post a Comment

0 Comments