मावळ जनसंवाद :- अमावस्या, पौर्णिमा किंवा सूर्य-चंद्र ग्रहणाच्या मध्यरात्रीच्या सुमारास बुवाबाजी, जादूटोणा, मंत्रतंत्र, श्रद्धा प्रक्रिया अश्या अंधश्रद्धा पसरवणाऱ्या घटना घडत असतात,अशा घटना मावळ तालुक्यात दिवसेंदिवस मोठ्या संख्येने घडत आहेत.रस्त्यावर, घराबाहेर, शेतामध्ये जादूटोण्याचे प्रकार घडत आहेत. एकविसाव्या शतकात आज अंधश्रद्धेचा कळस पाहायला मिळत आहे. जग आधुनिकतेकडे वाटचाल करत असताना नाणे मावळात अथवा ग्रामीण भागात अंधश्रद्धा अध्याप कमी होताना दिसत नाही. असाच अंधश्रद्धेचा प्रकार (दि.२७) रोजी नाणे परिसरात कामशेत - जांभवली रस्त्याला लागुन असलेल्या नाणे येथील वेसर कंपनी जाणाऱ्या रस्त्यावर अज्ञात व्यक्तीने राञी- अपराञी येऊन लिंबू, मिरच्या, टाचण्या, पुऱ्या, अंडी, कुंकू, कोहळ, गुलाल, बाहुली, नारळ ठेवलं असल्याचे समोर आले आहे. हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. त्यामुळे आजुबाजुच्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.अशा व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहे.
0 Comments