मावळ जनसंवाद :- मावळ तालुक्यात पूरेशा पाऊसाअभावी तालुक्याच्या विविध भागात मजुराच्या कामगारांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासत आहे. एकूण क्षेत्राच्या सुमारे १० ते २० टक्के क्षेत्रामध्ये भात लागवड झाली आहे. उर्वरित भात रोपे लागवडी साठी माणसे (मजूर) मिळत नसल्याने शेतकरी वर्ग नाराज आहे.शेतकरी बांधव नाराज असला तरी घरगुती माणसानी लागवड धीम गतिने सुरु असल्याचे चित्र नाणे मावळात दिसून येत आहे. मावळ तालुक्यात सर्वत्र भात लागवड करण्यासाठी मजुरांची कमरता असल्याने मजुरानी मजूरीत वाढ केली आहे.मात्र शेतकऱ्यापुढे पर्यायी व्यवस्था नसल्याने मागील तशी मजूरी शेतकरी बांधव मजुराना देऊ लागले आहे. मावळात महिला मजुराना अडिशे (२५०) तर पुरुष मजुराना तिनशे (३००) ते साड़े तिनशे (३५०) रूपये रोख दिले जात आहे. तसेच शेतमद्ये चिखल करण्यासाठी बैल जोडिला आठशे (८००) ते एक हजार (१०००) रूपये दिले जाते. एकीकडे भात लागवडीला उत्पादनाच्या पेक्षा ही जास्त होत असला तरी रोजच्या जीवनात भाताची आवश्यकता असल्याने रासायनिक युक्त खत भाताला न वापरता सेंद्रिय खताला प्रदान्य देत असल्याचे चित्र ठराविक शेतकरी शेती करीत असलेले पाहाव्यास् मिळते. शिवाय मावळ तालुक्यात लागवडीला उशीर होत चालला असल्याने भाताच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शकयता शेतकरी वर्ग (बांधव) वर्तविन्यात येत आहे विविध करनानी भात शेती परवडत नसल्याने काही शेतकरी जमीन अर्धलिनी देत आहे तसेच ता लुक्यातील खरीप भात लागवड क्षेत्र दरवर्षी घटत चालले आहे हि वास्तुस्थिती आहे.
0 Comments