Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

वाडिवळे जवळील इंद्रायणी नदीवरील पुल पाण्याखाली ..

 मावळ जनसंवाद :-  मावळ परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पुर आला असून वाडिवळे जवळील इंद्रायणी नदीवरील पुल पाण्याखाली गेल्याने त्या भागातील आठ गावांचा संपर्क तुटला आहे. मागील अनेक वर्षापासून पावसाळ्यात ही परिस्थिती निर्माण होत या भागातील नागरिकांना आशा  आनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. सांगीसे, वळक, वेल्हवळी, वाडिवळे, खांडशी, नेसावे, उंबरवाडी, बुधवडी व या गावांचा पुरामुळे संपर्क तुटला आहे. नदीपात्राचे पाणी पुलावरून वाहत असल्याने नागरिकांनी धोकादायक रित्या पुलावरून जाण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन ग्रामस्तांनी केले आहे. पुलाची उंची कमी असल्याने थोड्या पावसातही हा पाण्याखाली जातो.


          कामशेतला जोडणारा हा मुख्य पूल असल्याने सकाळी कामानिमित्त या गावातून बाहेर पडलेल्या लोकांना पुलावरून पाणी गेल्याने पुन्हा घरी जाणे अशक्य झाले आहे. त्यामुळे नदीचा प्रवाह कमी होण्याची वाट पाहत दुपार पासून सायंकाळी सहा पर्यंत नागरिक पुलाच्या दोन्ही तिरावर नागरिक ताटकळत उभे होते. तर काही जण आपला जीव धोक्यात घालून धोकादायकपणे पुलावरील पाण्याच्या प्रवाहातून पलीकडे गेले आहेत..शाळा विद्यार्थी , कामगारवर्ग, दुग्ध व्यावसायिक जाणारे नागरिक व महिला या सर्वांना या समस्येचा सामना करावा लागत आहे.  प्रशासनाने या समस्येकडे  लक्ष द्यावे अशी मागणी तेथील ग्रामस्थ करत आहे

Post a Comment

0 Comments