Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहू लागली, नदी प्रेमिंचे पावले नदीकडे..

मावळ जनसंवाद :-  
         
             मोठी विश्रांती घेऊन पुन्हा पाऊसाने मावळ तालुक्यात दमदार बॅटीग केली. त्यामुळे भात रोपे पुन्हा प्रफुल्लीत झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पाऊसाने दडी मारल्याने भात पिके कोमेजून जाऊ लागली होती. काही ठिकाणी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले होते. मात्र नुकत्याच पडत असलेल्या दमदार पावसामुळे पिकांना मिळाली संजीवनी,शेतकरी सुखावला आहे.यासह परिसरातील नदी,ओढे, तलाव, विहिरी ह्या तुडूंब भरली आहे. दोन दिवसापासून जोरदार पडत असलेल्या पाऊसामुळे इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. 
        नाणे मावळाच्या तीरावर असलेली इंद्रायणी नदीच पात्र समूध्द होऊन दुथडी भरुन वाहत आहे. नदी पात्राच्या दोन्ही बाजुला दाटलेली गर्द हिरवाई  इंद्रायणी नदीचे संथ गतीने वाहणारे पाणी असा निसर्गरम्य देखावा पाहण्यासाठी निसर्ग प्रेमीची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. हे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी मावळ तालुक्यातील  निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आलेले पर्यटन व नाणे मावळ वासिओ ची पावले नदी कडे वळू लागले आहे. अनेक नदी प्रेमी तसेच निसर्ग प्रेमी लोक या ठिकाणी दुचाकी, चारचाकी वरून जात असताना  सेल्फी व फोटो काढून आनंद लुटत आहे. या पावसाळ्यात पहिल्यांदाच नदी अशा पद्धतीने दुथडी भरून वाहत असल्याने नदी प्रेमी तसेच निसर्ग प्रेमी  आनद व्यक्त करीत आहे.
            यंदा उत्तराषांढा मध्ये जोरदार  पाऊस पडत आहे. भात पिकांना अथवा भात रोपे लागवड करण्यासाठी पाऊस महत्वाचा असल्याने शेतकरी वर्गा मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.




  







कामशेत - जांभवली या रस्तावर असणार्या तसेच नाणे मावळाच्या वेशीवर असणार्या इंद्रायणी नदीच्या पुलावर ठिपलेला फोटो

Post a Comment

0 Comments