Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

भूत-बाधाची पर्वा न करता जिगर बाज तरुणांनी स्मशान भूमीत थाटला संसार.

मावळ जनसंवाद :-  मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात कातकरी बांधव समाज आहे. हा समाज डोंगर परिसरात मिळेल त्या जागी गवताच्या झोपड्या बांधून त्या  ठिकाणी आपल्या अनेक कातकरी बांधवा समोहत राहत आहे. त्यास कातकरी वाडा असे आपण म्हणतो .काही कातकरी बांधव हे वीटभट्टीआपल्या कुठूबा समोहत काम करत आहे. काही बांधव हे मिळेल ते काम करून आपली उपजीविका भागवत आहे. तसेच काही कातकरी बांधव प्राणी व पक्षी यांची शिकार करून तसेच नदीवर मासे- खेकडे पकडून आपला संसार चालवत आहे. एकीकडे असे असताना दुसरीकडे अठरा विश्व दारिद्रय असताना पोटाची खळगी भरण्यासाठी राऊतवाडी येथील कातकरी बांधव  शिवा गंगाराम वाघमारे हा कामशेत येथील स्मशानभूमी मध्ये गेले काही दिवसापासून आपल्या कुटूबासह म्हणजेच पत्नी व २ वर्षाच्या मुली सोबत स्मशानभूमीत राहत आहे.स्मशानभूमीत जेवन बनवणे, जेवन करणे,तेथेच झोपणे हा नित्यक्रम अनेक दिवसापासून चालू आहे. सकाळच्या धावत्या लोकांच्या वेळेत जेवन बनवून आपल्या पत्नी मुलीसह  घेऊन दिवसभर खेकडे पकडल्यासाठी जावे लागते. कधी ६ खेकडी तर कधी ८ खेकडे घेऊन पुन्हा बाजारात विकण्यासाठी जावे लागते. ६ खेकडीला बाजारात २०० रुपये मिळतात. तर काही वेळा १५० रुपये सुधा मिळतात. त्यातील एक दोन खेकडे संध्याकाळी जेवनासाठी वापरली जाते. खेकडी पासून मिळणारी रक्कम हि वर्षाकाठी ठेवली जाते. तर काही रक्क्म तांदूळ, तेल मिरची घेण्यासाठी वापरली जाते. अशी परिस्थती असताना देखील ह्या कडे ना प्रशासनाचे ना लोकप्रतिनिधी कोणीही लक्ष्य देण्यास तयार नाही हि वस्तू स्थिती आहे. प्रशासनानी अथवा लोकप्रतिनिधी ह्या कातकरी बांधव समाजकडे  अन्न, वस्र, निवारा, शिक्षण, व रोजगार उपल्बध करून देणे गरजेचे आहे.अशी मागणी नागरिक करीत आहे. 


          प्रतिक्रिया  -  एकीकडे सर्व सामन्याचे एशपेय जीवन तर एकीकडे पोटाची खळगी भरण्यासाठी अठरा विश्व दारिद्रय असताना भूत-बाधाची पर्वा न करता जीवन कसे जगायचे असा प्रश्न स्मशान भूमीत राहत असलेला व्यक्तीला पडत असावा अशी माहिती सोपान खांडभोर यांनी दिली. 
              प्रतिक्रिया :-  मी राऊत वाडीला मामा-मामीकडे राहत आहे. मला लिहिता वाचता येत नाही .आम्ही गरीब असल्याने आम्हाला उन्हयाळात मला, माझी बायको,पोर यांना जेवन (किराणा आणण्सायासाठी ) पैसे  लागतात म्हणून खेकडी विकणे हा व्यवसाय करीत आहे. कोठेच राहण्याची सोय नसल्याने स्मशानभूमी मध्ये गेले काही दिवसापासून आपल्या कुटूबासह म्हणजेच पत्नी व २ वर्षाच्या मुली सोबत स्मशानभूमीत राहत आहे अशी माहिती  शिवा गंगाराम  वाघमारे  यांनी दिली.   

Post a Comment

0 Comments