मावळ जनसंवाद :- कामशेत-उकसान, पाले नामा या गावांना जाण्यासाठी (खडकीजवळ) बांधण्यात आलेला पुलाची दुरअवस्था झाली आहे. कालांतराने हा पूल पडल्यास उकसान, पाले ना.मा या गावांच्या संपर्क तुटेल. शिवाय ह्याच पाउलांवरून विद्यर्थी , नोकरदार वर्ग जनावरे अन्य यांचा वापर होतो. शिवाय हा पूल अरुंद आहे. या पुलावरून फक्त एक फोर व्हिलर वाहन जाते. जर एका बाजूने वाहन आले तर दुस-या बाजूने येणारे वाहनाला येण्यासाठी जागाच नसते. तसेच या पुलाच्या कडेचे सुरक्षेसाठी असणारे लोखंडी पाईप हे सुद्धा नाहीत. त्याच प्रमाणे या पुलाच्या मध्यभागी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. तसेच या पुलावरची खडी व डांबर निगुन गेले आहे.पुलाच क्षमता दिवसं दिवस कमी होत असूनत्यामुळे वाहने सरकून पडण्याची भीती वाढली आहे. प्रशासन या कडे लक्ष्य देत नाही असा आरोप ग्रामष्ठ करीत आहे, पावसाळ्याच्या वातावरणात पाऊस पडल्यानंतर ह्या रस्त्यावर अपघात होतो. या प्रकारचा त्रास नागरिकांना सोसावा लागतो. तसेच रस्त्याच्या बाजूने झाडे जुडेपे वाढल्यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. रात्री अपरात्री येणा-या जाणा-या प्रवाशांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागते. प्रशासनाने लवकरात लवकर पुलाच्या कठडाचे काम लवकरात लवकर दुरुस्त करावे. अशी मागणी नागरिक करत आहे.
0 Comments