रिक्षातून बेकायदा वाहतूक
मावळ तालुक्यात वाहतुकीचे नियम धब्यावर बसून पुणे- मुबई हायवेवर तसेच मावळ तालुक्याच्या शहरात अथवा खेड्यातील चौका-चौकात , शाळा, महाविद्यालय ,दवाखाना,रेल्वे स्टेशन .तसेच काही महत्वाच्या रस्त्यावर बेकामपणे आणि बेदरकारपणे काही प्रमाणिक रिक्षा वाले सोडले तर रिक्षा चालविणाऱ्या रिक्षा चालकांची मुजोरी दिवसेदिवस वाढत चालली आहे. प्रवासी , विद्यार्थी आणि पादचा-यांच्या जिवासी खेळणारे रिक्षा चालक तीन आसनी रिक्षा मधून चार पेक्षा जास्त प्रवासीची बेकायदेशीर पणे वाहतूक सुरु आहे. हे चित्र सर्रासपणे पहावयास मिळत आहे. नियमापेक्षा जास्त प्रवासी घेऊन जाणारे रिक्षाचालक या मार्गावर सर्रास दिसतात.काही रिक्षाचालक पीएमसीच्या बसच्या समोर रिक्षा उभी करून प्रवासी घेण्याचे धाडस करतात.शिवाय काही रिक्षाचालक हे क्षमतेपेक्षा मोठ्या प्रमाणात शालेय विध्यार्थी घेऊन जाताना दिसत आहे.
प्रशासनाने बेकायदेशीर रिक्षा चालकांवर कार्यवाही करावी.अशी नागरिकांची मागणी आहे.
0 Comments