मावळ जनसंवाद :- कामशेत - जांभिवली (नाणे दरम्यान) या रस्त्याची पुन्हा दुरवस्था मोठ्या प्रमाणात झाली आहे. कामशेत- जांभिवली या रस्त्याचे मे- जून महिन्यात मुरुमीकरण, डांबरीकरणाच एक थर टाकण्यात आला होता हि वस्तू स्थिती आहे. तदनंतर पुन्हा विविध ठिकठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला साईटपत्र्यावर भेगा पडल्या आहेत. तसेच ठिकठिकाणी रस्त्याच्या मध्य भागी खड्डे पडून दुरव्ष्ठा झाली आहे. मागील दोन आठवड्यापूर्वी ह्याच रस्त्यावरून एक माल वाहतुक डपर खाली पडला होता.सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.संबधित रस्त्याचे काम करणाऱ्या ठेदेदाराने रस्त्याच्या कामाचा दर्जा राखला नसल्याचे यावरून स्पष्ट झाले. दिसून येत आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, ठेकेदाराने काम निकृष्ट दर्जाचे केल्याने सुरुवातीला एक महिन्यातच संबधीत रस्त्याची विविध ठिकाणी मोठे खड्डे पडून दूरवष्टा होण्यास सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी हा रस्ता खचला असून त्यावर मोठ्या भेगा पडल्या आहे. शिवाय रस्त्याच्या दोन्ही साईटच्या सेफ्टी कड नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण ही वाढत आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही साईटचे मुरूम वाहून गेले आहे. जास्त पाऊस पडल्याने रस्ता वाहून जाऊ शकतो. असे चित्र पहावयास दिसत आहे.
नागरिकांना रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नागरिकांच्या पैशाचा अपव्यय होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहे. प्रशासनाने युद्ध पातळीवर रस्त्याची दुरुस्ती करावी. जेणेकरून नाणे मावळातील नागरिकांच्या संपर्क तुटणार नाही अशी नागरिकांची मागणी आहे.
0 Comments