मावळ जनसंवाद :- नाणे मावळात पावसाचे आगमन झाल्याने शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मावळ तालुक्यात भात हेच खरीपाचे मुख्य पिक असून जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांची पेरणीची कामे उरकली होती.जून महिना संपत आला तरी नाणे मावळात पावसाचे आगमन झाले नव्हते. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण होते. मागील दोन-तीन दिवसापासून पावसाचे सतत हजेरी लावली आहे. त्यामुळे नाणे मावळ अथवा मावळ तालुक्यात सर्वत्र पाणीच पाणी पहावयास मिळत आहे. हा पाऊस भात विकासाठी अतिशय उपयुक्त असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.काही शेतकरी बांधवानी भात लावणी सुरु केली आहे.
फोटो:- आपणही आपल्या कुटुंबाला भात लागवडीसाठी खारीचा वाठा उचलावा ह्या
भावनेने पाऊसापासून भिजण्याची पर्वा न करता चिमुकलीच्या हातात रोपे घेताना कोंडीवडे ना.मा येथे ठीपलेला फोटो
0 Comments