मावळ जनसंवाद :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजगाव येथील सावित्रीच्या लेकींना सायकलचे वाटप करण्यात आले. या लेकींना शिक्षण घेण्यासाठी दररोज पाच किलोमीटर पायी जावे लागत होते.या अनुषंगाने डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २ चे सामाजिक कार्यकर्ते व झोन चेअरपर्सन लायन भरत इंगवले यांच्या पुढाकार घेऊन लायनस क्लब ऑफ पूणे सेलिब्रेशनस व मेडीजैन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने मुलीना नवीन २५ सायकल देऊन पायपीट थांबवली. मुलींच्या चेहऱ्यावर ओसांडून आनंद वाहत होता.जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास पालक,शिक्षक,विद्यार्थी उपस्थित होते. दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली तत्पूर्वी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम पथकाच्या तालावर वाजत गाजत स्वागत केले. यावेळी डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन लायन शैलजा सांगळे,झोन चेअरपर्सन लायन भरत इंगवले,युवा नेते नितिनशेठ इगवले,प्रेसिडेंट लायन जितेंद्र ठोंबरे,सेक्रेटरी लायन् पद्मजा कदम ,खजिनदार लायन सीमा ठोंबरे,व्हाईस प्रेसिडेंट गूरूपरसाद कनोजिया, लायन्स क्लबचे नवनिर्वाचित सभासद व सविता इंगवले, विश्वास कामठे,अतुल दळवी,चंद्रकांत दरेकर, मेडीजैन ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर संदीप लूणावत,प्रेसिडेंट डॉ.पराग जैन सेक्रेटरी डॉ निलेश कटारिया ,खजिनदार डॉ.किशोर जैन त्याप्रमाणे मेडीजैन ट्रस्ट चे सभासद व नीता लूणावत, सरपंच दिपाली साबळे,पोलीस पाटील राजश्री तंबोरे, ग्रामपंचायत सदस्य महादू शेडगे,श्रीरंग गोडे, कौशल्या पवार, उज्वला पोटफोडे ,ममता, सुरेखा , दत्ता कुटे व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोमनाथ शिंदे,तंटामुक्ती उपाध्यक्ष काळूराम भालसिंग,संतोष असवले, माजी सरपंच रवींद्र शेलार, उपसरपंच माजी उपसरपंच बजाबा हिले ,शरद सोरकाते,शिवाजी पवार,संदीप कुटे,संदीप कुटे,संतोष भालशिंगे,हरिभाऊ मोरमारे ,रवींद्र पवार सर्व व्यवस्थापन समिती सदस्य आजी माजी ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच, दूध विकास सोसायटीच्या चेअरमन मंदाबाई कुडले शाळेतील सर्व स्टाफ ग्रामस्थ इत्यादी असे बहुसंख्येने उपस्थित होते.झोन चेअरपर्सन लायन भरत इंगवले म्हणाले,"लायन्स क्लब मार्फत दरवर्षी ग्रामीण भागातील मुलीसाठी ५१ सायकल देत असतो आणि त्या सायकल एक वर्षा नंतर परत दुरूस्त पण करून दिल्या जातात व त्याचा खर्च पण क्लब मार्फत केला जातो.सायकल पट्टू नारायण मालपोटे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. निवृत्त मुख्याध्यापिका सोनवणे मॅडम यांची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
शाळेतील मुलीना सायकल मिळणेकामी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन सरचिटणीस रामदास वाडेकर व उपसरपंच श्री नवनाथ ठाकर यांनी परिश्रम श्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मावळ तालुका निवेदक संघाचे सदस्य श्री योगेश बबन माझिरे यांनी केले.
0 Comments