Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

वाहतुकीच्या नियमांचे प्रशिक्षण घेण्याची नागरिकांकडून मागणी

मावळ जनसंवाद :-  नाणे मावळ या भागात कामशेत - जांभवली, कामशेत - घोणशेत, कामशेत - उकसान ह्या गावांना ह्याच रस्त्यावरून जावे लागते शिवाय नाणे मावलात शाळा, महाविद्यालय, धरण, तीर्थ क्षेत्र असल्याने ह्याच रस्त्याने पर्यटक, बाहेरगाव वरून येणारे शिक्षक तसेच नाणे मावळातुन विद्यार्थी, कामगार वर्ग , महिला त्या रस्त्याने कामशेत किंवा अन्य ठिकाणी कामानिमित्त जात असतात. ह्या रस्त्यांवर  (१८ वर्षाखालील)  लहान मुले मोठ्या प्रमाणात  वाहने चालवितात.या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या अनेक दुचाकी व् चार चाकी चालकांना त्रास होत आहे. शिवाय नाणे मावलात जाण्या साठी कामशेत- जांभवली  या रस्त्यावर (नाणे रोड) असलेले रेल्वे गेट (४३- ए ) जवळ मोठ्या प्रमाणात शिस्तीचे पालन न करता  बेकायदेशीरपणे वाहने थांबवले जातात. तेथे मोठ्या प्रमाणात वाहन चालक बेकायदेशीर वाहने उभी करतात. त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. 

       नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत आणि अपघाताचे प्रमाण कमी व्हावे,यासाठी वाहतूक पोलीस नागरिकांच्या सुरक्षीततेला प्राधान्य देत वाहतुकीच्या नियमांची कडक अंमलबजावणी करावी अशी मागणी नागरिक करीत आहे. तसेच अधिकाधिक नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्यास प्रवृत्त करणे, वाहतूक कोंडीवर उपाय योजना करणे, ह्या साठी वाहतुकीच्या  नियमांचे प्रशिक्षण घेण्याची मागणी नागरिक करीत आहे. 




Post a Comment

0 Comments