मावळ जनसंवाद :- मावळ तालुक्याच्या पूर्व भागासह पश्चिम भागात शेतीला जोडव्यवसाय म्हणून अनेक शेतकरी दुग्धव्यवसाय करीत आहेत. परंतु यंदा जून महिन्यातच चाराटंचाई निर्माण होऊ लागल्याने दुग्धव्यवसाय शेतकऱ्यांना चारा वाढीव किमतीने घ्यावा लागत आहे.परिणामी दुग्धव्यवसाय अडचणीत येत असून नाणे मावळातील शेतकऱ्याचे आर्थिक गणित कोलमडू लागले आहेत ही वस्तुस्थिती आहे. बरेच शेतकरी शेतीला पर्याय म्हणून दुग्धव्यवसायाची निवड करतात. मावळ तालुक्यात सहकारी दुध संस्था आहे. तसेच काही ठिकाणी छोट- मोठ्या दुध डेयरी खाजगी स्वरुपात आहे. त्या ठिकाणी शेतकरी बांधव आप- आपले दुध संस्था व खाजगी डेयरीला घालीत आहे. त्यातून मिळणाऱ्या पैशातून आपल्या संसाराचा गाडा चालतो. मात्र मागील वर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने पेंढा हा मोठ्या प्रमाणात भिजला आहे. शिवाय पावसामुळे कडधान्यांच्या पेरण्या कमी प्रमाणात झाल्याने चाराही घटला आहे. सध्या जनावरांना चारा नसल्याने ज्या शेतकऱ्याकडे जास्त चारा आहे. त्यांच्याकडून तो वाढीव दराने विकत घ्यावा लागत आहे. परिणामी चारा हा (पावळ्या) पेंढा शेकडा दर ४०० रुपये, कडबा शेकडा दर ३२०० रुपये खरेदी करताना दिसून येत आहे. चारा उपलब्ध होत नसल्याने तसेच स्वताच्या शेतामधील चारा संपल्याने शेतकर्यांना चारा साठी गावोगावी वणवण फिरावे लागत आहे.सध्या गायीचे दुध प्रति लिटर ३५ आणि म्हशीचे दुध प्रति लिटर ५० रुपये भावाने विकले जात आहे. दुध दराच्या तुलनेत चा-याचा खर्च अधिक आहे. दुधाचे दर कमी असल्यामुळे दुग्धव्यवसाय अडचणीत आहे.शासनाने यावर त्वरित उपाययोजना करावी.अशी नागरिकांची मागणी आहे.
0 Comments