मावळ जनसंवाद :- मावळ तालुका निसर्गसंपदेने नटलेला आहे.किल्ले,लेणी,थंड हवेचे ठिकाण,धरणे आदि घटकांनी समुध्द तसेच कला संस्कृती व पारंपारिक वारसा लाभलेला हा तालुका आहे. मावळ तालुका हा निसर्गाने सौंदर्याची मुक्तहस्त उधळण, पावलोपावली इतिहासाच्या पाऊलखुणा आढणारा तालुका आहे. लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, राजमाची किल्ला, तुंग किल्ला,तिकोना किल्ला, को राईगड किल्ला,कामशेत,लोणावळा.खं डाळा,कार्ले लेणी, भाजे लेणी, एकविरा देवी मंदिर, भुशी धरण, राजमाची पॉइंट, कातळधार धबधबा, प्रतिशिर्डी शिरगाव,आजिवली देवराई आदि पर्यटन स्थळे आहेत.
मावळ तालुक्यात अनेक ठिकठिकाणी मुंबई-पुणे हायवेवर,बस थाबा,शाळा,शासकीय कार्यालये या ठिकाणी चौका-चौकात अनधिकृत फलक लावलेले आहेत.अनेक पक्षांचे तथाकथित कार्यकर्ते यांचे चौका-चौकात, वाढदिवसाचे व्यवसायिकांच्या जाहिरातीचे फलक लावलेले फलक हे धोकादायक पद्धतीने अनधिकृत प्लेक्स लावण्याचे चित्र सारांस पहावयास मिळते. या अनधिकृत फलकामुळे मावळ तालुक्याच्या विद्रुपीकरणात भर पडत आहे. काही फलक वाढदिवस अथवा नवनिर्वाचित कार्यकर्त्याची निवड, वाढदिवस होऊन सुद्धा काढले जात नाही. हि मोठी शोकांतिका आहे. तसेच मावळ तालुक्यात बहुतांश फलक हे परवानगी न घेता लावण्यात येते. अशा लावण्यात आलेल्या फलकांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. मावळ तालुक्यात ठीक-ठिकाणी लावल्यात आलेले फलक शहराच्या विकासाला घातक ठरत आहेत.अनधिकृत फलकांची समस्या असताना देखील मुंबई-पुणे हायवेवर लगत उभारण्यात आलेले अनधिकृत फलकही अंत्यत वाईट अवस्थेत उभे आहेत. दुरवस्था झालेल्या फलकांमुळे अपघाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काही ठिकाणी ह्या फलकामुळे अपघातही झाले आहे. दिवसें दिवस मावळ तालुक्यात अधिकृत फलकांबरोबरच अनधिकृत फलकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
प्रशासनाने सर्व भागातील फलकांचा योग्य तो सर्वे करून त्या संदर्भात योग्य ती पाऊले उचलणे गरजेची आहे तसेच मावळ तालुका प्लेक्सच्या विळख्यातून मुक्त व्हावा अशी मागणी नागरिक करीत आहे.

0 Comments