Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

डोंगर पोखरल्यामूळे व वृक्ष तोडमुळे वन्य प्राणी झाले बेघर

मावळ जनसंवाद :  नाणे मावळात मोठ्या प्रमाणात डोंगर पोखरले जात असल्यामुळे तसेच वृक्ष तोडमुळे वन्यजीव, वन्य प्राणी जंगलामध्ये  राहण्यासाठी सुरक्षाचे प्रमाण कमी  होत चालले आहे हि मोठी शोकांतिका आहे. 
      नाणे मावळात जांभवली,थोरण,शिरदे,पाले ना.मा,उकसान,सोमवडी,भाजगाव, कोळवाडी,उबरवाडी,गोवित्री,करंजगाव,साबळवाडी,मोरमारेवाडी,कोंडीवडे,नाणे,नाणोली,साई,वाऊंड,कचरेवाडी,घोणशेत,या गावांना डोंगर लाभले आहे. शिवाय नाणे मावळात सह्याद्रि पर्वताची  रांग असुन नाणे मावळात मोठ्या प्रमानात डोंगर,दर्या,नदी, पर्वत हे निसर्गाचे देने मोठ्या प्रमाणात लाभले आहे. डोंगर उंच असुनही झाडे दाट आहेत.या झाडा मध्ये वन्यजीव, वन्यप्राणी त्यामध्ये ससा,कोल्हा,माकड,वानर,वाघ,डुक्कर,बिबट्या,मोहर अदी वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात डोंगरातील व्रक्ष् तोड व डोंगर पोखरल्यामुळे बेघर झाले असुन ते मानवी वस्ती कडे धाव घेत आहे. काही वन्य प्राणी त्यामध्ये डुक्कर व बिबट्या हे शेतकरी बांधवांच्या शेतामधील ऊस ह्या पिका मध्ये राहत आहे. शिवाय हे वन्यप्राणी पिकांचे नुकसान करत आहे. पिकामध्ये राहत असल्यामूळे शेतकरी बांधवांना रात्रीच्या वेळत पिकाना पाणी देने जोखमीचे झाले आहे. शिवाय वाघ,डुक्कर, बिबट्याच्या वावरामुळे नाणे मावळातील लोक भयभीत झाले आहे. धनदांडग्यांच्या जीवावरती बिल्डर्स  डोंगर पोखरून बेकायदेशीर फार्म हाउस बांधत आहे. त्याकडे शासनाचे प्रतिनिधी लक्ष देण्यास तयार नाही.असे प्रकार नाणे मावळात चालू आहे.   
        प्रशासनाने अथवा वनविभाग यांनी लवकरात लवकर उपाय योजना करावी जेणे करुन वन्य प्राणी पासुन शेतकरी बांधवांचे नुकसान होणार नाही तसेच वन्यजीव,वन्य प्राणी बेघर होऊ नये  तसेच  ज्या ज्या ठिकाणी बेकायदेशीर फार्म हाउस बांधले त्या त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई करावी  तसेच मोठ्या प्रमानात वृक्षचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. वृक्ष लागवड करावी अशी मागणी नाणे मावळातील नागरिक करीत आहे.  
                            

Post a Comment

0 Comments