Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

टेंभी फाटा ते करंजगाव गाव हे बनले खड्यांचे माहेर घर ..!

 

मावळ जनसंवाद :-  कामशेत ते जांभवली या रस्त्यालगत करंजगाव या गावाकडे जाणाऱ्या स्त्याची दुरवस्था मोठ्या प्रमाणात झाली असून ठीक - ठिकाणी खड्डेच खड्डे पडलेले असून एक प्रकारची रस्त्याची चाळण तयार झाली आहे. शिवाय रस्त्यावर प्रत्येक ठिकाणी खडी ,गोटे पडलेले आहेत. तसेच रस्त्यावरचे डांबर निघून गेले आहे. रस्त्यावर येणारे-जाणारे प्रवासी, व्यावसाईक वर्ग,शेतकरी वर्ग,दुध व्यवसाय,विद्यार्थी वर्ग यांना या खड्डेमय रस्त्यामुळे जाने-येणे अवघड झाले त्यामुळे टेंभी फाटा ते करंजगाव हा रस्ता खड्डेमय झाला आहे. मागील महिन्यात पाऊस पडल्याने विशेषता म्हणजे रस्त्यावर पाऊसाचे पाणी साचले होते पाणी साचल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना वाहन चालवताना मोठ्या प्रमानात त्रास होतो. रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे हे मध्यभागी असून एखाद्या वाहनाला ओरटेक करायचे झाले तर अपघात होतोच. दुसरीकडे खड्डे रस्ताच्या किनारीवर दाखल आहे.तर काही खड्डे मध्यभागी रस्त्यावर खड्डे असल्यामुळे दुचाकी मोठार वाहन घसरण्याची शक्यता आहे. तसेच वाहन चालवताना खड्डा मध्ये गाडी आढळते त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होतात. शिवाय रस्तेवर काही ठिकाणी उंचवटे/काही ठिकाणी खोलगट भाग आहे. शिवाय रस्याच्या किनारी ह्या पूर्णपणे खड्डेमय झाल्या आहेत. तसेच दोन्ही साईट पट्या ह्या पूर्णपणे ररस्यापेक्षा १ ते २ फुट खाली गेल्या आहे. 

           ज्या ज्या वेळी रस्त्याचे काम पूर्ण करायची वेळेस रस्ताचा काही भाग हा खोलगत असल्यामुळे काही ठिकाणी रस्त्याची उंची वाढवणे गरजेचे आहे. परंतु येथील रस्त्याची केवळ खडी व  डांबर टाकून रस्ता तयार केला जातो. सबब रस्त्याची लेवल हि रस्त्याच्या बाजूच्या शेताबरोबर असते. पाउसाळ्यात शेताचे पाणी हे रस्त्यावर येत असल्यामुळे शेत आहे कि रस्ता हेच कळत नाही. असे येणारे जाणारे प्रवाशी सांगतात.पावसाळ्यात त्या गटारात पाणी जास्त प्रमाणात तुंबून राहते. या मुळे ते पाणी रस्त्यावर येते व रस्ता खराब होतो. या भागातला रस्ता हा चड उताराचा आहे अपघाती वळनाचा आहे. त्या मुळे प्रवास करताना या उतारांना वाहन या खड्डेमय रस्त्यामुळे सरकतेडगमगते त्या मुळे अपघात होतो. या संकटाना सामोरे जाऊन प्रवास करावा लागतो. त्याचप्रमाणे या रस्त्याच्याकडेने काटेरी झाडेझुडुपे आहेत ती या रस्त्याच्याकडेने असल्यामुळे ती रस्त्यामध्ये आली आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. या भागातील  नागरिकांना महत्वाचे कामास दुस-या गावात जाण्यासाठी रस्ता खराब असल्यामुळे खूप वेळ लागतो. यामुळे नागरिकांचे महत्वाचे काम होण्यास उशीर होतो. या रस्त्याचा त्रास रात्रीच्या वेळी जास्त करून प्रवाशांना धोकादायक वाटत आहे. या रस्त्याच्या दुरावस्तेमुळे प्रवास कसा करावा असा प्रश्न नागरिकांना पडतो. 

            प्रशासनाने तत्काळ पाऊसाळा पूर्वी या रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात करावी. जेणेकरून प्रवाशांची गेईरसोय होणार नाही. अशी मागणी नागरीक करीत आहेत. 





Post a Comment

0 Comments