Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

बेकायदेशीर पिस्तुल बाळगल्या प्रकरणी तिघांना कामशेत पोलिसांकडुन अटक...!

मावळ जनसंवाद :- बेकायदा, विनापरवाना गावठी कट्टा जवळ बाळगल्या प्रकरणी तिघांना कामशेत पोलिसांकडुन अटक अटक करण्यात आली. 


       कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार.( रविवार दि.२५ एप्रिल २०२१ रोजी) रोजी गोपनीय बातमी दाराकडून कामशेत पोलिसस्टेशनचे पोलिस नाईक राम कानगुडे यांना मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कामशेत पोलीस नाईक राम कानगुडे, पोलीस हवालदार समीर शेख, महेंद्र वाळुंजकर व सागर बनसोडे असे पोलिस  स्टापचे पथक तयार करून त्यांना संशयित आरोपीचे वर्णन सांगून ते पवना चौक कामशेत येथे येणार असून त्यांच्या त्यांच्या कडे पिस्तल असल्याची खात्रीशीर बातमी  मिळाली आहे.त्या अनुषंगाने कारवाई साठी पंचासह छापा टाकून त्यांना ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर पथकाने पंचासह  सापळा रचून पवना चौक येथे असणारे रत्ना अमृततुल्य या दुकानासमोर रोडच्या कडेलाथांबलेले संशयीत तीन इसम यांना चारही बाजुनी घेऊन ताब्यात घेतले असता त्यांचे जवळ एक गावठी बनावटीचे लोखंडी पिस्टल  व मॅग्झीन  मिळून आली  त्यावरून  इसम नामें  १) अमोल श्रीराम मोहोळ (वय - २२), २) रोहित संजय भवार (वय- १९) ३) कृष्णा गोपाळ भोपळे (वय- २१) सर्व रा. इंद्रायणी कॉलनी, कामशेत यांच्यावर  भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलिस कायदा १३५, भा.द.वि.कलम ३४ प्रमाणे कामशेत पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना दि.२९/०४/२०२१ पर्यंत पोलिस  कस्टडी रिमांड मिळाले आहे. सदर बाबत पोलिस नाईक राम कानगुडे यांनी फिर्याद दिली असून याप्रकरणी पुढील तपास मा.पोलिस निरीक्षक संजय जगताप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महेंद्र वाळुंजकर करत आहेत

              सदरची कामगिरी मा.अभिनव देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मा.विवेक पाटील अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मा.नवनीत कॉउत सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा विभाग, पोलीस निरीक्षक संजय जगताप कामशेत पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार समीर शेख, महेंद्र वाळुंजकर, पोलिस नाईक राम कानगुडे, सागर बनसोडे, अंकुश नायकुडे पोलीस कॉन्स्टेबल विनोद नागलोथ यांनी केली आहे. 

Post a Comment

0 Comments