Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

मावळात निसर्ग सौंदर्याचा ऱ्हास ..!

मावळ जनसंवाद :- सह्याद्रीच्या डोंगररांगात वसलेल्या निसर्गिक साधनसंपत्ती तसेच डोंगर दऱ्या, निसर्गाचे मोठे देणे असणारा तसेच भौतिक सुविधा मुबलक असलेल्या मावळ तालुक्यातील जमिनीचे आकर्षण महाराष्ट्रसह अनेक राज्यातील धनिकांना आहे. वनक्षेत्राच्या घन दाट जंगलाने मावळ तालुक्याच्या सौंदर्यात भर पडली आहे. या सौदर्याला गेल्या दोन दशकांपासून दुष्ट लागली आहे. मावळ तालुक्यातील टेकड्या व वनक्षेत्राच्या हद्दीत  मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड व उत्खनन  केले जाते. ह्या कडे कोणीही लक्ष्य देण्यास तयार नाही. हि वस्तू स्थिती आहे. मावळ तालुक्यातील काही टेकड्याचे मोठ्या प्रमाणात लचके तोडून त्या ठिकाणी कोणत्याच  प्रकारची शासनाची परवानगी नसताना महाराष्ट्र तसेच अनेक  राज्यातील धनिकांना अलिशान असे बंगले रो हाउस बांधले आहे. ना त्यांच्या कडे ना प्रशासनाचे ना लोकप्रतिनिधीचे लक्ष्य नाही असे नागरिक सांगतात. अतिक्रमण करणारे हे जमीनदार किंवा बडी मंडळी असल्याने तक्रार केली तरी त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे सहसा कोणी तक्रार करण्यास धजावत नाही.विशेषकरुन ग्रामीण भागात जमिनी खरेदी करून प्लोतिंग करून विक्रीचा व्यवसाय तेजीत आहे जागोजागी सिमेंटची जंगले उभी राहत असून कसलीही परवानगी न घेता स्थानिक व्यक्ती व त्या खात्यातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने डोंगरांचे तसेच छोट्या मोठ्या ठेकड्यांचे उत्खनन करीत आहे. मावळ तालुक्यामध्ये काही काही ठिकाणी उत्खनन खोदताना जीवित हानी झाली होती असे नागरिक सांगतात. असे असताना संबंधित प्रशासन रॉयल्ठी काढण्यासाठी तात्काळ एक दिवसात अर्ज देऊन त्याच दिवशी परवानगी देते. हि बाब खेद्नीय आहे.तसेच काही ठिकाणी उंच टेकड्याच्या ठिकाणच्या बंगल्याच्या रस्त्यासाठी डोंगर, टेकडीचे उत्खनन होत आहे.तर काही ठिकाणी बंगल्यासाठी झाडांची कत्तल केली जाते.तर काही ठिकाणी नद्यांच्या पत्रात अतिक्रमण करून त्या ठिकाणी अलिशान  बंगले अथवा रो हाउस बांधले आहे.                                                                             मावळात निसर्ग सौंदर्याचा ऱ्हास वाचवण्यासाठी सह्याद्रीच्या डोंगररांगात काही ठिकाणी वड, पिंपळ, लिंब, चिंच, आंबा,बेल करंज, आपटा, साग, लाख, बाभूळ, या वृक्षांची लागवड करणे काळाची गरज आहे. कारण या वृक्षांचा पाला, शेंगा, फळे, साल व लाकूड किफायतशीर असते. जनावरांचा चारा व पक्षाचं आश्रय स्थान असते. तसेच मनुष्याला वड ८० टक्के, पिंपळ १०० टक्के, लिंब ७० टक्के व इतर असा ह्या निसर्ग सौंदर्यापासून उदा. झाडापासून ऑक्सिजन मिळतो.कोरोनाच्या महामारीपासून वाचण्यासाठी माणसाला ऑक्सिजन किती महत्वाचा आहे हे जिवंत उदाहरण आहे.                                                                                                                                                                           प्रशासनाने मावळातील निसर्ग सौंदर्याचा ऱ्हास थाबवण्यासाठी तात्काळ सपूर्ण मावळ तालुक्यातील अतिक्रमण झालेल्या नद्या, नाले, डोंगर, टेकड्या संदर्भात संबधीत विभागाला तात्काळ पंचनामा करून कारवाई करण्यात यावी. अशी नागरिकांची मागणी आहे. 

Post a Comment

0 Comments