मावळ जनसंवाद :- नाणे मावळातील गावगातील, वाड्या वस्त्या मधील महावितरणच्या डीपीसह विजेच्या खांबांची दुरवस्था मोठ्या प्रमाणात झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विजेचे खांब बदलले गेले नसल्याने ते जीर्ण अवस्थेत/ मोडकळीस आले आहे. या खांबांना आधार नसल्याने अनेक ठिकाणी ते वाकलेल्या स्थितीत आहेत. तसेच विजेच्या ताराही जीर्ण/ लोमकळत आहे. नाणे मावळात ह्या समस्या मोठया प्रमाणात आहेत. शिवाय ह्या समस्या पाउसाळ्यात वारंवार होतात. त्यामुळे नाणे मावळात काही ठिकाणी वीज १० ते १५ दिवस खंडित होते. त्या नंतर महावितरणचे कर्मचारी-तात्पुरती स्वरूपाची कामे केली जाते. शिवाय महावितरण अधिकारी ग्राहकांना मीटर कनेकशन देताना कोणतेच निकष वापरत नाही फक्त मीटर कनेकशन देयाचे म्हणून देतात. उदा. अंतर व इतर समस्या मोठ्या प्रमाणात उध्दभवतात. काही ठिकाणी पोलावरचा दीव जातो.दीव गेल्यानंतर महावितरणचे कर्मचारी महिन्याभर लक्ष देत नाही. आज करू उद्या करू अशी करणे वारंवार देतात. महावितरणाने नाणे मावळात ज्या ज्या ठिकाणी पोल जीर्ण झाले त्या ठिकाणी पाउसाळ्यापूर्वी नवीन पोल बसवावे. तसेच ज्या ज्या ठिकाणी तारा लोकमळत आहे त्या ठिकाणी तारा व्यवस्थीत कराव्यात अशी मागणी नाणे मावळातील नागरिकांची मागणी आहे.
1 Comments
Playminiprice.com: youtube - Videoodl.cc
ReplyDeletePlayminiprice.com: youtube - Free video games for kids & adults. Get youtube to mp3 y2mate up to 70% OFF with the latest video games.