Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

गोल्डनचे जेष्ठ शिक्षक शंकर धावणे राज्य स्तरीय गुणिजन गुरुगौरव २०२० पुरस्काराने सन्मानित...!

मावळ जनसंवाद :- श्री.शंकर धावणे यांचा जन्म १६ सप्टेंबर १९६७ रोजी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील तडवळे येथे झाला.त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मूळगावी झाले. महाविद्यालयीन शिक्षण बार्शीच्या श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी येथे सन १९८९ मध्ये पूर्ण झाले .सन १९९०  ते १९९२ मध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे पदव्युत्तर अर्थात एम.एस्सी.शिक्षण पूर्ण केले.त्यानंतर सांगली जिल्ह्यातील विटा या तालुक्याच्या ठिकाणी व्यावसायिक पदवी अर्थात बी.एड. पूर्ण केले.कांगोरीगड माध्यमिक विद्यालय आडावळे ता.पोलादपूर जिल्हा रायगड या विनाअनुदानित  शाळेतून त्यांनी आपल्या अध्यापन कार्यास प्रारंभ केला.त्यानंतर श्री.शरदचंद्रजी पवार प्रशाला सारोळा ता.बार्शी जिल्हा सोलापूर येथेही विनाअनुदानित शाळेत दोन वर्षे अध्यापनाचे काम केले.त्यानंतर सन १९९८ मध्ये गोल्डन ग्लेडस एज्युकेशन सोसायटीचे गोल्डन ग्लेडस माध्यमिक विद्यालय करंजगाव तालुका मावळ जिल्हा पुणे येथे अध्यापन सेवेत रुजू झाले.मावळ तालुक्यातील या भागाची शैक्षणिक गरज ओळखून आपल्या उच्च शैक्षणिक पात्रतेचा आणि अध्यापनातील अनुभवाचा वापर करून येथील शैक्षणिक  विकासासाठी योगदान देण्याचे निश्चित केले. सुरवातीला गोल्डन ग्लेडस विद्यालयास शासन मान्यता देखील नव्हती.खुप संघर्षानंतर या विद्यालयास शासन मान्यता जून १९९९ मध्ये प्राप्त झाली.त्यानंतर शाळेला अनुदान मिळविण्यासाठीचा संघर्ष सुरू झाला.तीन तीन चार चार दिवस उपाशी पोटी राहून केवळ पाणी पीऊन त्यांनी आपले अध्यापनाचे काम चालू ठेवले. आपल्या उच्च शैक्षणिक पात्रतेचा आणि अध्यापनातील अनुभवाचा वापर करून ग्रामीण भागात सुध्दा गणिता सारख्या कठीण विषयावर अधिक लक्ष केंद्रित करून शंभर टक्के निकालापर्यंत योगदान देण्याचे काम केले आहे.एवढेच नाहीतर स्वतःच्या शाळेतील दैनंदिन कर्तव्य आणि कार्य जबाबदारीने प्रभावीपणे न डगमगता कठिण व प्रतीकूल परिस्थितीतही संकटाचा सामना मनाने  खंबीर राहून आत्मविश्वासाने मावळ तालुक्यातील व जिल्ह्यातील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी निर्धाराने काम चालू ठेवले.विद्यार्थी हेच आपलं दैवत मानून, कोरोनाच्या काळात शाळा बंद असूनही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून स्वतः ऑनलाइन यू ट्यूब द्वारे विद्यार्थ्यांना शिकवणारे, मावळ तालुका गणित, विज्ञान अध्यापक संघ स्थापन करून मावळ तालुक्याचे स्थान पुणे जिल्ह्यात अग्रस्थानी पोहोचविणारे, एक उत्तम संघटक, कुशल मार्गदर्शक. मावळ तालुक्यातील शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे पुणे जिल्हाचे पदाधिकारी आदरणीय श्री.शंकर धावणे गोल्डन ग्लेडस माध्य. विद्यालय, करंजगाव  यांनी अविरतपणे आपले काम चालू ठेवत तालुक्यातील व जिल्ह्यातील विद्यार्थी आणि शिक्षकांपुढे आदर्श निर्माण करुन समाजात कार्याचा महामेरू उभा केला. ज्ञानदानाचे पवित्र काम करत अध्यात्माची कास धरुन निष्ठापूर्वक सेवावृत्तीने आणि गणितासारखा अवघड विषय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने शिकवत असल्यामुळे विद्यार्थ्यांची गणित विषयाबद्दल असलेली भीती नाहीशी करण्याचे काम त्यांनी मनापासून केले. त्यांच्या हातून शिकून गेलेले अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. ह्याचं श्रेय शंकर धावणे यांना लाभले आहे. ग्रामीण भागातील अनेक मुली शिक्षणापासून वंचित राहतात परंतु त्यांच्यामध्ये अभ्यासू वृत्ती वाढीस लावली. नकळतच त्या मुली पुढे शिकतात आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहतात.शाळेत रुजू झाल्यापासून विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहून, प्रसंगी कठोर शिक्षा करुन विद्यार्थ्यांमध्ये आदर युक्त भिती निर्माण करुन समाजात राहावं असं, बोलावं कसं ,कुटुंबाची उन्नती कशी करावी याचे सतत मार्गदर्शन करण्याचे काम त्यांनी केले.त्यांना सामाजिक कार्याची जाण व भान असल्याने ग्रामीण भागातील मुलामुलींची असलेली गरीब परिस्थिती, त्यांचे भयानक प्रश्न समजून घेऊन नकळतच गोरगरीब विद्यार्थ्यांप्रती सहानुभूतीची, मदतीची भावना मनात ठेऊन त्यांच्याकडून त्या मुलांचे प्रश्न सोडवले आहेत. आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो ही भावना आणि तळमळ त्यांच्यात दिसून येते.


       मावळ तालुक्यातील विज्ञान व गणित विषय शिकवणाऱ्या शिक्षकांना एकत्र आणून त्यावेळचे न्यू इंग्लिश स्कूल वडगा्वचे प्राचार्य मा.श्री चंद्रकांत गाढवे सर यांच्या मार्गदर्शनाखाली गणित व विज्ञान अध्यापक संघ त्यांनी स्थापन केले. शंकर धावणे हे शिक्षकांना मार्गदर्शन व प्रोत्साहन देत असल्याने अनेक शिक्षक यामध्ये क्रियाशील झाले आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचा खूप मोठा उपयोग होतो. शिक्षकांचेही अनेक प्रश्न असतात. त्यांच्यावर वेगळ्या ठिकाणी गळचेपी केली जाते मग तो जिल्हा परिषदेमधील प्रश्न असो किंवा त्यांच्यावर झालेला अन्याय, त्यांना वाचा फोडण्याचे काम त्यांच्या माध्यमातून कायमच होतं व त्या शिक्षकांना न्याय देण्याचे काम शंकर धावणे यांनी आपल्या महाराष्ट्रा राज्य शाळा कृती समितीच्या माध्यमातून करत असल्यामुळे त्यांना जे्वढे धन्यवाद द्यावेत ते कमीच आहेत. या समितीच्या माध्यमातून त्यांनी अनेक शाळांना भौमितिक पेटी, इलेक्ट्रॉनिक बेल, ग्रंथालयास पुस्तके दिली त्यांचा विद्यार्थ्यांना खूप लाभ होतो.ते गणित विषयाचे तालुक्यात आणि जिल्ह्यात तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम करत असून सध्या गेल्या पाच वर्षापासून एस.एस.सी.बोर्डात मॉडरेटर म्हणून काम पहात आहेत. सन २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षात भारती विद्यापीठाच्या वतीने शंकर धावणे यांनी गोल्डन ग्लेडस माध्यमिक विद्यालयात राज्य पातळीवरील गणित विषयासाठी शाळा बाह्य परीक्षेचे आयोजन केले होते.त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील इयत्ता दहावीच्या वर्गातील विद्यार्थी कुमार ओंकार भाऊ भुंडे या विद्यार्थ्यांने  गणित विषयात ८०  पैकी ८० गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. एवढेच नाहीतर त्याच विद्यार्थ्यांने मार्च २०२० मध्ये झालेल्या एस.एस.सी परीक्षेत ९४.६० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम व तालुक्यातील बोर्डाच्या केंद्रात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. वर उल्लेख केलेल्या सर्व कार्याची आणि कोरोना कालावधीत समर्थ आॅनलाईन यू ट्यूब लाइव्ह क्लासद्वारे राज्यातील आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना अविरतपणे केलेल्या मार्गदर्शनाची दखल घेऊन मुंबई येथील मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या राष्ट्रीय पातळीवर सामाजिक काम करत असलेल्या संस्थेने गोल्डन ग्लेडस माध्यमिक विद्यालय करंजगावचे जेष्ठ अध्यापक श्री.शंकर धावणे यांना सन २०२० चा गुणवंत गुरुगौरव शिक्षकरत्न राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर केला.हा पुरस्कार सोमवार दिनांक ८ मार्च २०२१ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचे अध्यक्ष मा.अॅडव्होकेट कृष्णाजी जगदाळे  यांच्या हस्ते आणि उपस्थित मान्यवर यांच्यासह मुंबई येथील सांस्कृतिक सभागृहात आॅनलाईन पध्दतीने समारंभपूर्वक शंकर धावणे यांना प्रदान करण्यात आला.हा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर गोल्डन ग्लेडस एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष  व सचिव  यांच्या वतीने आणि गोल्डन ग्लेडस माध्यमिक विद्यालयातील सर्व सहकारी मुख्यापक बापूराव नवले, सुलाभ राळे, दत्तात्रेय महाजन, अनिल सातकर, अशोकराव वाडेकर,दिनेश टाकवे, दिपक गालफाडे,विजय केदारी, अमोल कराड, गुलाब देवरे, सुदाम मोरमारे, उत्तम गावडे, संजय टाकवे,दिनकर सातकर यांनी विद्यालयात श्री.शंकर धावणे यांचा गुणगौरवपर मनोगत व्यक्त करुन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊन तसेच पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार केला.या सत्काराला उत्तर देताना हा मिळालेला राज्यस्तरीय पुरस्कार माझा एकट्याचा नसून विद्यालयातील.प्रत्येक सहकारी शिक्षक, सेवक व संस्थेचा आहे असे शंकर धावणे यांनी म्हटले आहे.त्यांनी हा पुरस्कार त्यांचे आई- वडील आणि त्यांना आध्यात्मिक मार्गदर्शन करणारे श्री सद्गुरू समर्थ चरणी समर्पित केला आहे.नाणे मावळ, मावळ तालुका व पुणे जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरील शिक्षक बंधू- भगिनी, नातलग, मित्रमंडळी, हितचिंतकाकडून शंकर धावणे यांच्यावर शुभेच्छांचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

गोल्डन ग्लेडस एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष  व सचिव व तसेच गोल्डन ग्लेडस माध्यमिक विद्यालयातील सर्व सहकारी यांच्या वतीने श्री.शंकर धावणे यांचा गुणगौरव पुरस्कार निमित्त पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करताना ठीपलेला फोटो. 


 प्रतिक्रिया:- सर, तुमच्या जीवनाचा आलेख चढता आहे. तो अधिक वृद्धिंगत व्हावा आणि आम्ही सर्वांनी त्याकडे अभिमानाने, कौतुकाने पहावं इतकच...! आजचा राज्यस्तरीय पुरस्काराचा दिवस म्हणजे एक उत्तम संघटक आणि एका सरळ मनाच्या व्यक्तिमत्वाचा आणि आदर करण्यासाठीचा दिवस आहे. असे मार्मिक संदेश श्री.अंभोरे बी.जी. नवीन समर्थ विद्यालय (तळेगाव दाभाडे) यांनी अशी प्रतिक्रिया मावळ जनसंवाद न्यूज दिली.

प्रतिक्रिया:- आजपर्यंत शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी, पालक आणि शिक्षक  यांच्यासाठी केलेल्या कार्याची तसेच लाॅकडाऊनच्या काळात सर्व जगाचे व्यवहार बंद असताना विद्यार्थ्यांना यूट्यूब चॅनेलद्वारे आॅनलाईन केलेल्या अध्यापन कार्याची पोहच म्हणजे हा मिळालेला राज्यस्तरीय गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार होय.हा पुरस्कार मी माझे आई- वडील आणि मला कार्य करण्यासाठी प्रेरणा व सामर्थ्य पुरवणारे श्री.सदगुरु समर्थ आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या चरणी समर्पित करतो.असे मार्मिक संदेश अध्यक्ष गणित अध्यापक संघ मावळ व महाराष्ट्र राज्य शाळा कॣती समिती मावळचे शिक्षक श्री.शंकर धावणे यांनी अशी प्रतिक्रिया मावळ जनसंवाद न्यूज दिली.



Post a Comment

0 Comments