Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

नाणे मावळात विजेचा लपंडाव...!

मावळ जनसंवाद :नाणे मावळ या भागात जांभवली, थोरण, शिरदे,पाले नामा, उकसान, सोमवडी, भाजगाव,कोळवाडी,गोवित्री,उंबरवाडी,करंजगाव,साबळेवाडी,मोरमारवाडी,कांबरे,कोंडीवडे,नाणे,नवीन उकसान,नानोली,साई, वाऊड,कचरेवाडी, घोणशेत व इतर वाड्या वस्त्या असून येथील परिसरात विजेचा दिवसा- रात्री लंपडाव सुरूच आहे. सर्वात महत्वाची सुविधा म्हणजे लाईट आवश्यक असती त्या ठिकाणी लाईट तेथे उपलब्ध होत नाही. आणि जरी लाईट उपलब्ध झाली तरी ती लाईट वेळेवर येत नाही. तसेच दोन ते तीन दिवस लाईट डिम असती. तथापि कधी-कधी तर पूर्ण दिवस भर किवा दोन-दोन दिवस येत नाही. त्यामुळे शेतक-याचे खूप मोठे नुकसान होत आहे.शिवाय या लाईटच्या लोडशेडींग मुळे गावातील घरातल्या इलेक्यट्रिक वस्तू उदा. टिव्ही फ्रीज, बल्प, संगणक, होमथेटर,मोबईल इत्यादी वस्तु खराब होत आहे.त्याचप्रमाणे काही गावामध्ये  लाईटचे पोल हे गंजल्यामुळे तुटण्याचे धोके आहेत. त्याचप्रमाणे पोलाच्या तारा तुटलेल्या आहेत. त्याप्रमाणे लाईटचे डीपीमधले फ्युज तुटलेले असतात. असे असल्यामुळे शेतक-याला या गोष्टीचा मोठा फटका बसत आहे. भर पाऊसात विधुत समस्या उदभवतात. शिवाय उदभवल्यानंतर महावितरण त्याकडे दुर्लक्ष करते. महावितरणच्या कारभाराला सामान्य नागरिक कंटाळला आहे.दिवसभर लाईट नसते शिवाय रात्रीच्या वेळीस लाईट नसल्यामुळे मोठा प्रश्न निर्माण होतो.तसेच महिन्यानंतर लाईट असो अथवा नसो बिल त्याच दराने येतो. नाणे मावळातील लाईट कमी प्रमाणात खंडीत करावी. तसेच ज्या ज्या ठिकाणी लाईट पॉल खराब झाले ते दुरुस्त करावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहे.                                                             प्रतिक्रिया:-नाणे मावळात लाईटच्या लोडशेडींग असून प्रशाशनाने लाईटच्या समस्या दुरुस्ती साठी पाऊले उचली पाहिजे अशी नाणे मावळातील नागरिकांची मागणी आहे अशी प्रतिक्रिया कांब्रे गावचे  उपसरपंच श्री. बाळासाहेब प-हाड  यांनी दिली आहे.  


Post a Comment

0 Comments