Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

कोरोनाच्या काळात कामशेत बाजारपेठ ग्राहकांसाठी सज्ज...!

 मावळ जनसंवाद :
            मावळ तालुक्याची जिवनवाहिनी असणाऱ्या कामशेत बाजारपेठेमध्ये गणपती बाप्पाचे साहित्य खरेदीसाठी रोज गर्दी होत असून कोरोना महामारीच्या काळात बाजारपेठ ग्राहकांसाठी सज्ज झाली आहे.परीसरातील पवन मावळ,नाणे मावळ,आंदर मावळ अशा तीनही विभागातून नाणे मावळ या भागात जांभवली, थोरण, शिरदे,पाले नामा,उकसान,सोमवडी,भाजगाव,कोळवाडी,गोवित्री,उंबरवाडी,करंजगाव,साबळेवाडी,मोरमारवाडी,कांबरे,कोंडीवडे,नाणे,नवीन उकसान,नानोली,साई,वाऊड,कचरेवाडी,घोणशेत व इतर वाड्या वस्त्या रोज हजारो शेतकरी खरेदीसाठी कामशेतला पसंदी देत असून कामशेत बाजारपेठ रोज गर्दीने फुलून निघत आहे. 
         पोलिस ठाण्यापासून ते शिवाजी चौक,नाणे रस्ता,पवनानगर रस्ता,साईबाबा चौक,कामशेत रेल्वे स्थानक आदि परीसरातील व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानाची रंगीबेरंगी मंडप उभारुन विद्युत रोषणाईने मनमोहक सजावट केलेली आहे. कामशेत शहरामधे वाहनतळाची व्यवस्था नसल्यामुळे वाहतूक कोंडीमध्ये रोज भर पडत आहे.बाजारपेठेतील मुख्य चौक असणाऱ्या शिवाजी चौकामध्ये विविध विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली असून यामध्ये विधूत लाईट, मिताई पेढे बर्फी असे अनेक पदार्ख  खाद्य  रांगोळी, झेंडूची फुले,सोने- चांदी विविध आदि व्यावसायिकांचा समावेश आहे.रोज खरेदिसाठी येणाऱ्या नागरीकांमुळे वाहतुक कोंडी नित्याचीच झाली आहे. रोज खरेदिसाठी येणाऱ्या नागरीकांची गर्दी होत असून कामशेत बाजारपेठेला याञेचे स्वरुप आल्यासारखे दिसत आहे.                    
          

Post a Comment

0 Comments