मावळ जनसंवाद :- राज्यात प्रथम दरवर्षी भारती विद्यापीठातर्फे सप्टेंबर आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये विविध प्रकारच्या परीक्षांचे आयोजन करण्यात येते.फेब्रुवारी सन २०२० मध्ये घेण्यात आलेल्या गणित प्रविण परीक्षेत गोल्डन ग्लेडस माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी ओंकार भाऊ भुंडे याने इयत्ता दहावी गणित प्रविण परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.या परीक्षेत ओंकार भाऊ भुंडे याने ८० पैकी ८० गुण प्राप्त केले आहेत. त्याला १००० रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे.मार्च सन २०२० मध्ये झालेल्या एस.एस.सी.बोर्ड परीक्षेत देखील ओंकार भुंडे याने १०० पैकी १०० गुण मिळवून केंद्रात प्रथम क्रमांक पटकाविला असून विभागीय मंडळाच्या गुणवत्ता यादीत उच्च स्थान प्राप्त केले आहे आहे.त्यामुळे त्याचे आणि त्याला मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री.शंकर धावणे सर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच भारती विद्यापीठातर्फे फेब्रुवारी २०२० मध्ये घेण्यात आलेल्या इंग्रजी बाह्य परीक्षेत नवीन समर्थ विद्यालयातील विद्यार्थीनी कुमारी इंद्रायणी उदयसिंग ठाकूर हिने इयत्ता दहावी इंग्रजी अॅडव्हान्स्ड परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.तिने या परीक्षेत ८० पैकी ८० गुण मिळविले आहेत.तिला १००० रुपयांचे पारितोषिक प्राप्त झाले आहे.त्याबद्दल तिचे आणि तिला मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री.सुदाम वाळुंज सर व इंग्रजीच्या अध्यापिका सौ.कळमकर मॅडम यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रतिक्रिया:- पावित्र्य, सदाचार, विश्वास, ज्ञान, सुख आदी सगळ्या शब्दांचा पर्याय हा शिक्षकच आहे. नैतिकता आणि चारित्र्य हेच शिक्षकांचे खरे भांडवल असते. तेच संपन्न असले पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्या सुसंस्कारित आदर्शवादी जीवनाचे श्रेय शिक्षकांना दिले तर शिक्षकी जीवन सार्थ आणि धन्य होते. पालक आणि शिक्षकांच्या समन्वयातूनच उद्याची (विद्यार्थी) पिढी आणि राष्ट्राचे आधारस्तंभ घडणार आहेत.असे मार्मिक संदेश अध्यक्ष गणित अध्यापक संघ मावळ व महाराष्ट्र राज्य शाळा कॣती समिती मावळचे शिक्षक श्री.शंकर धावणे यांनी अशी प्रतिक्रिया मावळ जनसंवाद न्यूज दिली.
0 Comments