Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

मावळ तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रातील कोरोना योध्दा...!

मावळ जनसंवाद :- मावळ तालुक्यातील गणिताचे एकमेव तंत्रस्नेही शिक्षक शंकर धावणे हे नाणे मावळ मधील करंजगाव येथील गोल्डन ग्लेडस माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून गेली २५ वर्षे कार्यरत आहेत १४ मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने राज्यात व देशात लाॅकडाऊन घोषित करण्यात आला.सर्वत्र कडकडीत लोक डाऊनची अंमलबजावणी सुरू झाली.त्यामुळे सर्व शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा, दुकाने, हॉटेल्स यासह सर्व व्यवहार ठप्प झाले. एकामागून एक लॉकडाऊनची मालिका सुरू झाली. तशी शिक्षकांना व पालकांना सर्व शाळा व महाविद्यालये पूर्ण बंद झाल्याने विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी वाटू लागली.शंकर धावणे यांनी घरातूनच शाळेचे काम चालू ठेवण्याचा निर्धार पक्का केला. सुरुवातीला विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून अभ्यासक्रमावर आधारित आठवी,नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ तयार करून व्हाट्सअप आणि युट्युब द्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू केले. व्हिडिओला विद्यार्थ्यांकडून,पालकांकडून आणि शिक्षकांकडून पुणे जिल्ह्यातून व जिल्ह्याबाहेरील तालुक्यातून भरभरून प्रतिसाद मिळायला लागला. या माध्यमातून शंकर धावणे यांनी आपल्या स्वतःच्या राहत्या घराच्या पहिल्या मजल्यावर पंधराशे स्क्वेअर फुट च्या हॉलमध्ये स्टुडिओ तयार करून ऑनलाईन क्लास सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कोल्हापूर येथे पदव्युत्तर शिक्षण घेत असताना कॉम्प्युटरचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. तसेच तज्ञ मार्गदर्शक म्हणून जिल्हा स्तरावर व तालुकास्तरावर शिक्षकांना संगणकाद्वारे प्रशिक्षण देण्याचा अनुभव असल्याने ऑनलाईन क्लास घेण्यास काहीच अडचण वाटली नाही.याच निर्धाराने त्यांनी युट्युब चॅनेल काढले आणि आज त्यांच्या ऑनलाइन क्लासला राज्याच्या कानाकोपऱ्यातून दररोज हजारो विद्यार्थी क्लासला उपस्थित राहतात. राज्याच्या नांदेड,लातूर,बीड,उस्मानाबाद,तुळजापूर,बार्शी,सोलापूर,रायगड,रत्नागिरी, महाड, पनवेल,ठाणे,मुंबई,अहमदनगर,पुणे जिल्ह्यातून अधिकाधिक प्रतिसाद मिळत आहे याविषयी अधिक माहिती देताना शंकर धावणे यांनी सांगितले की माझ्या चॅनलला समर्थ ऑनलाइन टेक हे नाव दिले असून "शाळा बंद पण शिक्षण सुरू" हे त्यांच्या क्लासचे ब्रीद वाक्य आहे. या चॅनेलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या उर्वरित भागापर्यंत पोहोचण्याचा त्यांनी ध्यास घेतला आहे.या पद्धतीने ते केवळ विद्यार्थ्यांचाच क्लास घेत नसून तालुक्यातील व जिल्ह्यातील इतर शिक्षकांनाही व्हिडीओ पीपीटी आणि लाईव्ह क्लास बद्दल गुगल मीट व झूम ॲप द्वारे मीटिंग च्या माध्यमातून प्रशिक्षण देण्याचे काम करतात हे विशेष उल्लेखनीय बाब आहे त्यामुळे शिक्षकांमध्ये पीपीटी आणि व्हिडिओ बद्दल जागृती झाल्यामुळे ते स्वतःचे व्हिडिओ तयार करत आहेत. आणि ऑनलाईन क्लास घेत आहेत ही फार महत्त्वाची बाब आहे.लॉक डाऊन सुरू झाल्यापासून गेल्या ५ महिन्यांपासून रविवारी सुद्धा सुट्टी न घेता दररोज सायं. ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत इयत्ता आठवी गणित,नववी व दहावी गणित भाग १ व २ या विषयांचे तीनही वर्गाचे ऑनलाईन क्लास घेत आहेत. यासाठी त्यांचा इयत्ता सातवीत शिकणारा मुलगा अनुज याची मदत घेतात. सध्या हे दोघे पिता-पुत्र अहोरात्र मेहनत करून तीनही वर्गाच्या अभ्यासक्रमावर पीपीटी तयार करतात आणि सायं.५ ते ८ या वेळेत ऑनलाईन क्लास घेतात आतापर्यंत त्यांनी १२५ ते १५० व्हिडिओ तयार केले आहेत. हे व्हिडिओ त्यांच्या "Samarth Online Tech" या चॅनेलवर हजारो विद्यार्थी लाॅकडाऊनच्या काळात घरात बसून अभ्यास करत आहेत सकाळपासूनच विद्यार्थ्यांना सायंकाळच्या क्लासची ओढ लागलेली असते.पीपीटी मधील विविधता,ॲनिमेशन, ट्रॅन्झिशन,आवाजाची डेन्सिटी,अध्यापनात कठीण भाग सोप्या पद्धतीने शिकविण्याचे कौशल्य यामुळे विद्यार्थी क्लासला रमतात असे शंकर धावणे यांनी सांगितले. "शाळा बंद पण शिक्षण सुरू "ही संकल्पना त्यांनी ऑनलाईन क्लास चालू ठेवून सार्थ करून दाखवली आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रेंज मिळत नसल्याने वेळ मिळेल तेव्हा रेंज उपलब्ध झाल्यानंतर आम्ही तुमचे व्हिडिओ पाहतो असे फोन करून विद्यार्थी कळवतात.        राज्यात आणि देशभरात लाॅकडाऊन कितीही दिवस राहिला आणि शाळा बंद राहिल्या तरी असे तंत्रस्नेही शिक्षक तयार झाल्यास शिक्षण बंद राहणार नाही हे यावरून लक्षात येते. मागील शैक्षणिक वर्ष सन २०१९-
२०२० मध्ये एप्रिल आणि मे महिन्यात वार्षिक निकाल तयार करण्यासाठी येत असलेल्या समस्या व अडचणीवर मात करण्यासाठी गुगल मीट व झुम अॅपच्या मीटिंग द्वारे मार्गदर्शन करण्याचे काम केले असल्याचीही माहिती त्यांनी दिली.    मावळ तालुक्यातील गणित व विज्ञान शिक्षकाचे विषयज्ञान समृद्ध व्हावे,शैक्षणिक विचारांची देवाण-घेवाण करता यावी तसेच शिक्षकांच्या अध्यापनातील समस्या दूर करण्यासाठी सन २०१० मध्ये न्यू इंग्लिश स्कूल वडगावचे त्यावेळचे प्राचार्य माननीय श्री चंद्रकांत गाढवे सरांच्या मार्गदर्शनाने आणि तालुक्यातील शिक्षक बांधवांच्या सहकार्याने शंकर धावणे यांनी मावळ तालुका गणित व विज्ञान अध्यापक संघ स्थापन केले या संघाच्या माध्यमातून शैक्षणिक साधन निर्मिती संदर्भात त्या वेळचे माननीय शिक्षणाधिकारी श्री.हारूण आतार साहेब व त्यावेळचे उपशिक्षणाधिकारी श्री.कारेकर साहेब यांच्या परवानगीने कार्यशाळेचे आयोजन केले.सध्या ते मावळ तालुका गणित अध्यापक संघ आणि महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे अध्यक्ष म्हणून काम पहात आहेत.

Post a Comment

3 Comments

  1. सुदर उपक्रम, सामाजिक भान ठेवून अशा अडचणीच्या परिस्थितीत, विद्यार्थी हित लक्षात घेऊन मा.श्री शंकर धावणे सरांचे कार्य अगदी कौतुकास्पद आहे. आम्हाला सर्व धावणे परिवारातील सदस्यांना त्यांंच्या कार्याचा सार्थ अभिमान आहे, धन्यवाद!
    👍👍

    ReplyDelete
    Replies
    1. Dhavane N.G.
      Principal,
      Tilaknagar Vidyamandir & Jr.College,Dombivali

      Delete
  2. PlayAmo Casino Login - JT Hub
    PlayAmo Casino Login · PlayAmo Casino Login · 경상북도 출장샵 PlayAmo Casino Login · PlayAmo Casino Login · PlayAmo 밀양 출장안마 Casino Login · PlayAmo Casino 구미 출장안마 Login · 전주 출장샵 PlayAmo Casino 아산 출장마사지 Login

    ReplyDelete