मावळ जनसंवाद :- नाणे मावळातील कामशेत -जांभवली, या रस्त्यावर तसेच अंतर्गत रस्त्यावर मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात झाला असून येणाऱ्या प्रवाशांना- म्हणजेच लहान थोर, मुले, दुग्धयवसाय धारक तसेच विद्यार्थी, महिला वर्ग इत्यादीना रस्त्याने जावे लागते.काही ठिकाणी कुत्र्ये ही पिसाळलेले आहे.येणाऱ्या- जाणाऱ्या प्रवाशाना चावा घेतात. त्यामुळे रस्त्याने जाणे घेणे धोक्याचे झाले आहे. अनेक ठिकानी भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले असून रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा वाहने व पादचा-यांना त्रास होतो.
खेडेगावांमध्ये शेणकाईवर/ टाकलेल्या कच-या भोवती ती अन्नाच्या शोधात फिरत असतात. भटकी कुत्री घोळक्याने शेणकाईवर/कचरा कुंडी भोवती येथे गर्दी करतात. पहाटे च्या सुमारास दुध घेऊन येणाऱ्या प्रवाशाना गाडी मागे चावण्यासाठी लागतात. त्या वेळेस शेतकरी वर्ग आपली जनावरे रानात चारण्यासाठी सोडत असतो. त्यावेळी ही मोकाट कुत्रे ही त्या जनावरांवरती भुंकतात. शिवाय काही कुत्रे पिसाळलेली असतात ती कुत्री जनावरे / माणसांवर चावा घेण्यासाठी धावून येतात. त्या भीतीने वाहन चालवणारे जोरात गाडी चालवतात. पावसाल्याचे दिवस असल्यामुळे रस्त्यावर चिखल साचल्यामुळे वाहन घसरते. त्या मुळे मोठ्या प्रमाणात अपघात होतो. तसेच रात्री कामावरून येणाऱ्या प्रवाशानाच्या सुद्धा मागे लागतात. प्रत्येक गावाच्या ग्रामपंचायती कडून यावर कोणतीही उपाययोजना होत नाही. अशी नागरिक तक्रार करत आहेत.दरवर्षी खेडेगावांमध्ये अनेक लोकांना भटकी कुत्री चावल्याने खेडेगावापासून दूर असलेला सरकारी दवाखाना मध्ये जाऊन लस टोचून घ्यावी लागत आहे.
खेडे गावातील भटक्या कुत्र्यांची पैदास वाढू नये. तसेच जेथे कच-याचे साम्राज्य आहे तेथील कचरा वेळेवर उचलल्यास कुत्र्यांचा मुख्य रस्त्यांवर (कामशेत -जाभवली )त्रास होणार नाही. असे नागरिक सुचवत आहेत. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा जेणेकरून रस्त्याने प्रवास करणाऱ्या व्यक्तीला व्यवस्थित प्रवास करता येईल अशी मागणी नाणे मावळातील नागरिक करीत आहे.
0 Comments