Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

नाणे मावळात महावितरणचे विधूत समस्यांकडे दुर्लक्ष...!

मावळ जनसंवाद :-    नाणे मावळातील गावांमध्ये तसेच इतर वाड्या वस्त्या विधूत समस्या मोठ्या प्रमाणात असून महावितरण या समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. या दुर्लक्षा मुळे शेतकरी बांधवांना विनाकारण नुकसान सोसावी लागते. तसेच काही ठिकाणी लाईट चे पोल हे वाकलेले आहेत. तसेच काही गावात मध्ये विधूत डीपी उघड्या आहेत.शिवाय दिवसातून दहा वेळा विधूत पुरवता खंडित होतो. याकडे महावितरण लक्ष्य / अथवा चोकशी सुद्धा करीत नाही. या प्रकारचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. अशी तक्रार नाणे मावळातील ग्रामस्थ करीत असून विधूत समस्या संदर्भात वारंवार सांगूनही कोणत्याच प्रकारची दखल घेतली जात नाही. 
               तसेच कामशेत अथवा नाणे मावळ परिसरात गेल्या महिन्याभरापासून विजेची ये-जा सुरु असल्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत 
​आहे ​
 विधुत पुरवता ये जा मुळे त्यांची नाराजी मोठया प्रमानात वाढते महावितरणाचे कर्मच्यारी गावामध्ये आल्यावर गावात कोणत्या प्रकारच्या विधुत समस्या आहे का नाही हे का पाहत नाही.असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे.   
            नाणे मावळात काही ठिकाणी विधुत तारा लोमकळत असून त्या एक मेकांना वाऱ्या मुळे स्पर्श होतात.शिवाय आजूबाजूला झाडे असल्यामुळे झाडांच्या फांद्या त्या विधुत तारा वर पडलेल्या आहे. स्पर्श झाल्यामुळे विधुत पुरवता खंडित होतो. या समस्या मुळे नागरिकांना विनाकारण अंधारात राहावे लागते. लाईट चे पोल हे वाकलेले आहेत. तर काही ठिकाणी पोल पडलेले आहे,विधूत समस्या संदर्भात वारंवार सांगूनही कोणत्याच प्रकारची दखल घेतली जात नाही. अशी तक्रार नाणे
​मावळातील ​
 ग्रामस्थ करीत आहे
.   
          गावामधील डिप्यांचे बॉक्सला दरवाजे नसल्यामुळे विजेचा झटका लागुन अपघात होण्याची शक्यता आहे.याकडे प्रशासनाने /महावितरणाने लवकरात लवकर विधुत पोल व तारा, डीपीचे फ्युज व्यवस्तीत करावी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 
           
 नाणे  मावळ  येथील गावात तसेच इतर वाड्या वस्त्या गावामधील विधूत समस्या मोठ्या प्रमाणात दाखल असून शाखा अभियंता  व कर्मचारी यानी प्रत्यक्ष पाहणी करून उपाय योज
ना कराव्या जेणेकरून ग्रामीन भागातील नागरिकांना कोणताच विधूत समस्या उदभवणार नाही. अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.    
    

Post a Comment

0 Comments