Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

येवलेवाडी (नायगाव) येथे स्मशानभुमी नसल्याने उघड्यावरच अंत्य संस्कार..!

मावळ जनसंवाद :- मावळातील येवलेवाडी (नायगाव) येथे स्मशानभुमी नसल्याने उघड्यावरच अंत्य संस्कार करावे लागतात.येथील नागरिकांना मोठया  प्रमाणात अडचणीचा  सामना करावा लागत आहे.मावळ तालुक्यातील काही ठराविक गावे वगळता त्या गावांना रस्ता,पाणी, लाईट,व्यायाम शाळा, स्मशानभूमी, दवाखाना आदी सुख- सुविधा असून देखील नाणे मावळातील काही गावांना मिळत नाही हि वस्तू स्थिती आहे.  
 येवलेवाडी (नायगाव) येथे स्मशान भूमी उघड्यावर असल्याने उन्हाळ्यात ठीक आहे.परंतु पावसाळ्यात प्रेताला अग्नी देण्यासाठी पाऊसामुळे अनेक समस्याला सामोरे जावे लागते.तसेच स्मशानभूमीवर कोणत्याच प्रकारच्या  सुविधा नाही. 
       येवलेवाडी (नायगाव)  येथे स्मशान भुमी कडे जाणारा रस्ता व्यवस्थित नसल्याने मृत देह नेण्यासाठी अडचणी येत असतात.तसेच निवारा शेड नसल्यामुळे पावसाळ्रयात शरण पेटवण्यासाठी नाईलाजाने टायरचा वापर करावा लागतो. टायरचा वापर मुळे प्रदूषण होत आहे. तसेच आजच्या घडीला रस्ताच नाही.तसेच पावसाळ्यात पुर्ण चिखल असतो.शिवाय ज्या ठिकाणी स्मशानभुमी नाही. त्या ठिकाणी निवारा शेड, लाईट, चौथरा सुद्धा नाही.  
       प्रशासनाने स्मशान भूमी बांधून द्यावी.अशी मागणी ग्रामष्ठ करीत आहे.तसेच मावळ तालुकातील अनेक  गावांत अशीच परिस्थिती असताना या कडे कोणीही  लक्ष देण्यास तयार नाही.असा आरोप नागरीक करीत आहे.
प्रतिक्रिया :-  गेले अनेक दिवसापासून  प्रशासनला  पाठपुरावा करुन देखील स्मशान भूमीसाठी जागा मिळत नाही हि दुर्दवी बाब आहे.  शिवाय  ग्रुप ग्रामपंचायतने ह्या कडे लक्ष्य घालुन आम्हाला  स्मशानभुमी  बांधून देण्यात यावी.अशी माहिती युवा उद्योजक सोपान पोपटराव येवले यांनी मावळ जनसंवादला दिली.



Post a Comment

1 Comments