Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मावळ गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन..!

मावळ जनसंवाद :-  निसर्ग चक्रीवादळाचा फटका मावळ तालुक्याला मोठ्याप्रमाणात बसला. त्यामुळे मावळ तालुक्यांमध्ये घरे, शाळा, शेती, पाॅलि हाऊसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील बऱ्याच प्राथमिक शाळा उद्ध्वस्त झाल्या आहेत.भविष्यात येणारे संकटा पासून बचाव करण्यासाठी निसर्ग चक्रीवादळा मध्ये  नुकसान झालेल्या शाळा व इतर शाळांचे बांधकाम हे आर.सी.सी (पक्के) पद्धतीचे व्हावे यासाठी मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मावळ तालुका गटशिक्षणाधिकारी सौ. वाव्हळ मॅडम यांना निवेदन देण्यात आले. यावेळी युवक अध्यक्ष कैलास गायकवाड,आंदर मावळ युवक अध्यक्ष कैलास खांडभोर, नाणे मावळ युवक अध्यक्ष चंद्रशेखर परचंड, उपसरपंच गोरख बांगर,अनंता ढवळे, सुदीप जानभोर, बाजीराव शिंदे आदी उपस्थित होते.
प्रतिक्रिया :-  मावळ तालुक्घयात घरांचं, शाळा, मालमत्तेचं, पीकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तसेच चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे वीजेचा खांब कोलमडून पडले आहे.अशा संकटावर  प्रशासनाने वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले आहे परंतु  शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अद्याप शासनाची  कोणतीच मदत आली नाही ती तत्काळ देण्यात यावी तसेच प्रशासनाने ज्या ज्या ठिकाणी शाळा पडलेल्या आहे त्या ठिकाणी मुलांना बसण्यासाठी  (शिक्षणसाठी) उपाय योजना करण्यात यावेत.अशी माहिती युवक अध्यक्ष कैलास गायकवाड यांनी मावळ जनसंवादला दिली.

Post a Comment

0 Comments