मावळ जनसंवाद :-
देशात आणि राज्यात कोरोना या विषाणूने प्रचंड थैमान घातले आहे.या कारणा करिता प्रशासनाने संचारबंदीची घोषणा केली आहे.या कारणांमुळे देशातील संपुर्ण व्यवस्था बंद पडलेली आहे.या करोना व्हायरस मुळे ही संचारबंदी तसेच लॉकडाऊन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि अशा परिस्थितीत जर ह्या आजाराचा प्रादुर्भाव वाढणार असेल तर येणाऱ्या काळातील CET या सारख्या परीक्षेसाठी ठोस उपयोजना करणे गरजेची आहे असे मत पुणे जिल्हा भाजयुमो विद्यार्थी आघाडीचे उपाध्यक्ष संस्कार चव्हाण यांनी प्रसिद्धी पञकाद्वारे व्यक्त केले.
या परीक्षेसाठी राज्यातील असंख्य विद्यार्थी दरवर्षी बसत असतात त्यातील अनेक जण ग्रामीण भागातील असतात.सध्या राज्यात ग्रामीण भागातील करोना रूग्णांची संख्या ही कमी आहे व सध्या या करोना विषाणूच्या धरतीवर ग्रामीण भागातील विद्यार्थी जर शहरात परीक्षेसाठी गेले तर करोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो या कारणास्तव अभियांत्रिकी आणि इतर अभ्यासक्रमांसाठी महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET) ह्या तालुकास्तरावर घेण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे ही प्रमुख मागणी करण्यात आली.
या बारावीनंतरच्या अभियांत्रिकी आणि इतर अभ्यासक्रमांसाठी महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET) या तालुका स्तरावर घेण्यात यावी या मागणी साठी भाजपा विद्यार्थी आघाडीने राज्याचे राज्यपाल,राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंञी,शालेय शिक्षण मंञी,उच्च शिक्षण मंञी या प्रमुख मंञ्यांना ई-मेल द्वारे पञ व्यवहार केला असुन सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे.
0 Comments