मावळ जनसंवाद :- मावळ तालुक्यातील अहिरवडे गावामध्ये एक पॉझिटिव्ह रुग्ण (कोविड-19) कोरोना ग्रस्त रुग्ण सापडला, त्यामूळे नायगाव, साते,चिखलसे ही गावे बफर झोन म्हणुन घोषित करण्यात आली आहे.अहिरवडे गाव हे कंटेनमेंट झोन तसेच चिखलचे,साते, नायगाव बफर झोन म्हणून घोषित करण्यात आले अशी माहिती मावळ तालुक्याचे तहसीलदार मधुसुदन बर्गे यांनी दिली तरी सर्वांनी शासनाचे नियमाचे पालन करावे सुरक्षेचे नियम पाळायचे असे आवाहन करण्यात आले. तसेच मावळ तालुक्यातील बहुतांश ग्राम पंचायत, पंचायत समिती, तहसील कार्यालय, पोलीस खाते, आरोग्य केंद्र आदि र्द्वारा आपल्या नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाद्वारा दिल्या जाणार्या आपत्कालीन सुचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.आपल्या गावातील नागरिकांच्या आरोग्याप्रति जागृत राहून सतर्कतेपायी गावातील नागरिकांच्या आरोग्याची आपत्कालीन परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात काळजी घेण्यात येत आहे.
मानव जातीला घातक ठरू पाहणार्या संसर्गजन्य विषाणू रूपी रोगाने संपूर्ण जगामध्ये धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. ह्याचं पार्श्वभूमीवर मदत नव्हे कर्तव्य ह्या हेतूने आज नायगाव गावठाण, राहुलनगर, शीव, वावरे वस्ती, लालगुडे वस्ती, दत्त कॉलोनी, येवलेवाडी येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष नवनाथ नथुराम चोपडे आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने मोफत सॅनिटायझर वाटप करण्यात आले.
गावातील समस्त नागरिकांनी आपली, आपल्या कुटुंबियांचे, मित्र परिवाराच्या आरोग्याची काळजी सतत आपले शरीर आणि विशेषतः हात स्वच्छ करून घ्यावी. तसेच आपल्या आजुबाजुचा परिसर स्वच्छ ठेवण्याची, संचार बंदी दरम्यान अनावश्यकरित्या घराबाहेर न पडण्याची व शासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करण्याचे आवाहनही यावेळी अध्यक्ष नवनाथ चोपडे यांनी करण्यात आले.

प्रतिक्रिया :- वारंवार स्पर्श केल्या जाणा-या वस्तु आणि पुष्ट्भाग यांची स्वच्छता आणि नेहमीच घरगुती विक्ल्नझर वापरून निर्जतुकीकरण करणे हा प्रभावी मार्ग आहे.त्तसेच कमीतकमी ६० टक्के अल्कोहोल असलेले सॅनिटायझर वापरा अशी माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष नवनाथ चोपडे यांनी मावळ जनसंवादला दिली.
0 Comments