Header Ads Widget


Flash news

    Loading......

मा.जिल्हाधिकारी पुणे यांचे आदेशावरून यवतमाळ, लातूर जिल्ह्यातील आणि राजस्थान राज्यातील १०८ नागरिक रवाना..!

मावळ जनसंवाद :- 
      मा.जिल्हाधिकारी पुणे यांचे आदेशावरून यवतमाळ जिल्ह्यातील ४७ , लातूर जिल्ह्यातील २१, आणि राजस्थान राज्यातील ४० असे एकूण १०८ मजूरांना सर्व प्रक्रियेतअंती ०८ वाहनांमधुन पाठविण्यात आले. त्यांना पाठविण्यापूर्वी, ग्रामीण मुळशी तालुक्यामध्ये लॉक डाउन शिथिल केल्यामुळे, सर्व उद्योग धंदे चालू असून आपल्या हाताला मिळणारे काम खंडित होणार नाही, याची त्यांना कल्पना तहसिल प्रशासनाने दिली. परंतु, त्यांची मानसिकता थांबण्याची नसल्यामुळे, COVID 19 च्या संदर्भाने त्यांची शारीरिक लक्षणे तपासून त्यांच्या वाहनांना जाण्यासाठी परवानगी देण्यात आली.  वरील प्रवाशांना यवतमाळ, जयपूर-राजस्थान, लातूर येथे  पाठविण्यासाठी  पिरंगुट, कासार आंबोली व माले ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, मंडळ अधिकारी श्री सुहास कांबळे हे मागील चार दिवस नियोजन करत होते.
     मुळशी तालुक्याचे तहसीलदार श्री अभय चव्हाण  व श्री अशोक धुमाळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक पौड यांनी या ०८ वाहनांतील मजूरांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments