Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

पक्ष्यांसाठी झाडावर पाण्याची भांडी..!

मावळ जनसंवाद :-  
             या वर्षी उन्हाळ्याची दाहकता अधिक जाणवत आहे. तालुक्याच्या काही भागामध्ये  पाण्याचा तुटवडा जाणवत असल्यामुळे पशु- पक्ष्यांचेही हाल होत आहेत. त्यांना जगण्यासाठी पाणी आवश्यक असल्याने येवलेवाडी (नायगाव) येथील उद्योजक सोपान येवले यांच्या वाढदिवसानिमित्त झाडांवर स्वखर्चाने पक्ष्यांसाठी पाण्याची व  खाद्य असलेली भांडी बांधली आहेत.
             काही ठिकाणी पाण्यावाचून पक्ष्यांचा मुत्यु होतो. अशा विविध बातम्या.संदेश येत असतात. पण प्रत्यक्ष मात्र कोणी तयार होत नाही. सोपान येवले यांनी वाढदिवसाचे औचित साधून हा आगळा- वेगळा उपक्रम राबविला.
             दरवर्षी प्रमाणे सोपान येवले मित्र परिवाराच्या वतीने वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम घेत असतात. 
          प्रतिक्रिया:-  उन्हाळा तीव्र असल्याने शेतावर ठीकठिकाणी पाण्याची भांडी भरून ठेवावी. तसेच  केकचा अनावश्यक खर्च टाळावा अशी माहिती उद्योजक सोपान येवले यांनी मावळ जनसंवाद दिली. 


छायाचित्र : सोपान येवले मित्र परिवार पक्ष्यांसाठी झाडावर पाण्याची भांडी ठिपलेला फोटो 

Post a Comment

2 Comments