मावळ जनसंवाद :-
लॉकडाऊनमुळे वेगवेगळ्या निवारागृहात असलेले कामगार मौजे-साई ता-मावळ जि-पुणे येथील २२ मजुर लॉकडाऊनमूळे अडकून पडले होते.सदरच्या मजुरांना आज दिनांक १४/०५/२०२० रोजी एसटी क्रमांक MH-14-BT-4568 गाव-देवरी जिल्हा - गोंदिया येथे छत्तीसगडच्या सीमेपर्यत महाराष्ट्र शासनाच्या वतीने मोफत प्रवासाने पाठविण्यात आहे यावेळी लोकांना मास्क आणि सॅनिटायझर वाटणायत आले निवासी नायब तहसिलदार आर.एल. कांबळे, तलाठी के.यु.जगताप, ग्रामसेवक एस. ए. ढोले , पोलीस पाटील उमेश काळोखे , आशा सेविका संगीता डेनकर, नाजूक वाघोले, सिताराम काटकर, गणेश पिंगळे, उद्योजक विठठल काळोखे , तसेच गावातील जेष्ट व्यक्ती हे उपस्थित होते. पाठवण्यात येणाऱ्या प्रवाशांना सोशल डिस्टन्स पाळणे बंधनकारक करण्यात आले होते.प्रवाशांसाठी चालवण्यात येणारी ही बस पूर्णपणे सॅनिटाईज करण्यात आली असून प्रत्येक प्रवाशाने चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल घातला असल्याची खात्री करुन घेण्यात येत होती. तसेच प्रवाशांच्या जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती.
0 Comments