मावळ जनसंवाद :- कोरोनाच्या संसर्गामुळे देशभरात लॉकडाउन वाढविण्यात आला आहे. ह्याचं पार्श्वभूमीवर कारखाने, दुकाने सर्वच खासगी, सरकारी आस्थापना बंद असल्याने संपूर्ण व्यवहार ठप्प झाले आहेत. मावळ भागात छोट्या, मोठ्या कंपन्यांमध्ये रोजंदारीवर काम करणारे मजूर मोठ्या प्रमाणात आहेत.
कारखाने बंद असल्याने त्यांचा रोजगार हिरावला गेला आहे. लॉकडाऊनमुळे वेगवेगळ्या निवारागृहात असलेले कामगार मौजे-टाकवे ब्रु व कान्हे -मावळ जि-पुणे येथील २८ मजुर लॉकडाऊनमूळे अडकून पडले होते.सदरच्या मजुरांना रोजी एसटी क्रमांक MH-14-BT-4088 व बस क्रमांक MH-40 N 9406 बिहारच्या सीमेपर्यत महाराष्ट्र शासनाच्या वतीने मोफत प्रवासाने पाठविण्यात आहे यावेळी लोकांना मास्क आणि सॅनिटायझर वाटणायत आले मंडलाधिकारी मुकुंद खोमणे, तलाठी योगेश वाघ, निंबाळकर तसेच गावातील जेष्ट व्यक्ती हे उपस्थित होते. पाठवण्यात येणाऱ्या प्रवाशांना सोशल डिस्टन्स पाळणे बंधनकारक करण्यात आले होते.प्रवाशांसाठी चालवण्यात येणारी ही बस पूर्णपणे सॅनिटाईज करण्यात आली असून प्रत्येक प्रवाशाने चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल घातला असल्याची खात्री करुन घेण्यात येत होती. तसेच प्रवाशांच्या जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती.
0 Comments