मावळ जनसंवाद :-
झाड
हे एक झाड आहे : याचे माझे नाते
वा-याची एक झुळुक
दोघांवरून जाते
मला आवडतो याच्या फुलांचा वास
वासामधून उमटणारे
जाणीव ओले भास
पहिल्यानेच याची मोहरताना फांदी
ठेवली होती बाळगाणी
याच्या कटिखांदी
मातीचे झाड, झाडाची मी, माझी पुन्हा माती
याच्या पानावरच्या रेषा
माझ्या तळहाती
ढलपी ढलपी सुटून मुळे झाली सल
रुजते आहे झाड
माझ्या रक्ताच्याही पैल
कधी तरी एके दिवशी मीच झाड होईन
पानांमधून ओळखीचे
जुने गाणे गाईन
नदीच्या अल्याडपल्याड..
- कवी: शांता शेळकें
मावळ तालुक्यातील मळवली, कार्ला येथील इंद्रायणी नदीवर मावळ जनसंवादचे वाचक उद्योजक किशोर जाधव यांनी टिपलेले निसर्गाचे विहंगम दृश्य.
0 Comments