Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

लॉकडाऊनचं गांभीर्य नसल्यामुळे मोकाटपणे वावरणा-या तरुणांची संख्या जास्त...!

मावळ जनसंवाद :-  
         कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात १७ मे पर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतीच मात्र या लॉकडाऊनचं गांभीर्य मावळवाशियांना नाही की काय, असा सवाल उपस्थित होत आहे. 
     एकीकडे संचार बंदी व जमावबंदी असताना संचारबंदी व जमावबंदीचे उल्लंघन करण्या-यावर पोलीस करवाई करीत आहे. तरी देखील नाणे मावळ भागतील बरेचशे तरुण घराबाहेर पडून जिवनाश्यक वस्तू खरेदी करण्याच्या नावाखाली कामशेत येथे काय चाललंय ? हे पाहण्यासाठी कामशेत येथे गर्दी करत आहे. या आपत्ती काळात शहरी भागातील तरुण काळजी न घेता लाॅकडाऊन चे उल्लंघन करुन  दिवस मजेत घालवताना दिसत आहे.
             कोरोना चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वत्र लाॅकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनचे व शासकीय नियमांचे पालन शहरी भागात होताना दिसत नाही. तसेच राज्यात कोरनोचा कहर पाहायला मिळत आहे.  
           कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्य आणि केंद्र सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन केला आहे. मात्र तरीही नागरिक रस्त्यावर येऊन गर्दी करत आहेत. भाजी खरेदीच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. इतकंच नाही तर विनाकारण रस्त्यावर फेरफटका मारणाऱ्यांचंही प्रमाण अधिक आहे.अशा लोकांमुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे पोलिसांनी मोकाट फिरणाऱ्यावर  कारवाई करुन देखील आजच्या स्थितीला मात्र रस्त्यावरील गर्दी हटत नसल्याचं चित्र पहावयास मिळत आहे.
 प्रतिक्रिया:- लॉकडाऊन फक्त शहरी भागातच आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिस प्रशासनाकडून अशा या विनाकारण मोकाटपणे वावरणा-या तरुणांवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे. असी  माहिती युवा उद्गयोजक  गणेश  जाधव यांनी मावळ जनसंवाद दिली आहे.



 प्रतिक्रिया:-  राज्यातील  वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्शभूमीवर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी 
कोरोना जनजागृती अभियान  सुरु  करण्यात यावे. असी  माहिती युवा उद्गयोजक  सोपान येवले यांनी मावळ जनसंवाद दिली आहे.




 

 

     छायाचित्र:-  कोरोना संदर्भ शासनाने दिलेले नियमाचे उल्लंघन होत असताना कामशेत येथे  
                            ठिपलेला  फोटो


Post a Comment

0 Comments