Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर सर्व क्षेत्रामध्ये सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत पेट्रोल, डिझेलचा पुरवठा करण्यात यावा..! -जिल्हाधिकारी नवल किशोर राम

मावळ जनसंवाद :-  
            पुणे दि.६ : पुणे जिल्हयातील पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे, खडकी व देहूरोड छावणी परिषद, नगरपरिषद, नगरपालिका, नगरपंचायत व पुणे ग्रामीण क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर सर्व क्षेत्रामध्ये पेट्रोल, डिझेल पंपचालकांनी येणाऱ्या  सर्व वाहनांना पास, ओळखपत्राची मागणी न करता सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेमध्ये पेट्रोल, डिझेलचा पुरवठा करण्यात यावा. तसेच राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोल, डिझेल शासनाने वेळोवळी निर्गमित केलेल्या विहित वेळेमध्ये सुरु राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिले आहेत. 
राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 13 मार्च 2020 पासून लागु करुन खंड 2,3,4 मधील तरतुदीची अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित केली आहे. त्याबाबतची नियमावली संदर्भि य 3 अन्वये प्रसिध्द केली आहे आणि जिल्हाधिकारी यांना सक्षम प्राधिकारी घोषित केले आहे.
कोविड-19 विषाणूचा साथ संसर्गाचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढत असल्याने आपत्कालीन उपाय योजनेचा भाग म्हणुन संदर्भिय 4 अन्वये गृह सचिव आणि अध्यक्ष राष्ट्रीय कार्यकारी समिती भारत सरकार, यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 10 (2) अन्वये संपुर्ण देशभरात मार्गदर्शक  सुचना, आदेश लागु केलेले आहेत. या अनुषंगाने नागरिकांची गर्दी होवू नये आणि परस्पर संपर्क होवुन संसर्ग वाढु नये याकरिता जमाबंदी आदेश लागु केलेले आहेत आणि उपरोक्त संदर्भ क्र.1 व 2 अन्वये सदरचे लॉकडाऊनचे आदेशास 17 मे 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
     पुणे जिल्हयातील पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे, खडकी व देहूरोड छावनी परिषद, नगरपरिषद, नगरपालिका, नगरपंचायत व पुणे ग्रामीण क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर सर्व क्षेत्रामध्ये पेट्रोल, डिझेल पंपचालकांनी येणाऱ्या  सर्व वाहनांना पास, ओळखपत्राची मागणी न करता सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेमध्ये पेट्रोल, डिझेलचा पुरवठा करण्यात यावा. तसेच राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोल, डिझेल शासनाने वेळोवळी निर्गमित केलेल्या विहित वेळेमध्ये सुरु राहतील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी सांगितले आहे.








Post a Comment

0 Comments