मावळ जनसंवाद :-
वैशाख व जेष्ठ महिन्यात भयानक उन्हाळा, वाढणारं तापमान, आणि अक्षरश: करपून निघणारी वनराई.. या सगळ्यात आपण स्वत:ला वाचवतो. पण पक्ष्यांचं काय ? इतक्या उष्णतेत स्वत: बरोबरच त्याची काळजी घेण्यासाठी पक्षी मित्र सदैव तत्पर असतात. त्या मध्ये अजून एक भर पडली असून ते म्हणजे कोंडीवडे ना.मा शेतकरी सखाराम नामदेव चोपडे यांनी आपली नायगाव येथील ४ एकर वडिलोपार्जित शेतजमीन मधील पिक तूर पेरली आहे.पेरलेले पिक तूर स्वत:साठी न वापरता पक्षांसाठी ठेवलेली आहे. शाळू हा रानातील जनावरासाठी ठेवला आहे. ह्या उपक्रमाचे नायगाव व बाजुबाच्या गावात ह्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. माणसे पिण्याच्या पाण्यासाठी धडपड करून पाणी मिळवत आहेत. मात्र, पक्ष्यांसाठी पाणी उपलब्ध करून देण्यास फार कमीजण झटतात. आठवी वर्गातील पक्षिमित्र अदित्य हनुमंत चोपडे यांनी आपल्या घरात पक्ष्यांसाठी अन्न व पाण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. ‘एक घास पक्ष्यांसाठी काढून ठेवा’, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.
अदित्य चोपडे यांनी प्लास्टिक डबकी पिण्याच्या पाण्यासाठी विविध झाडांना लटकावून त्यात नियमित पाणी भरले जात आहे. या उपक्रमामुळे पक्ष्यांची अडचण दूर होत आहे. पाण्याबरोबरच घासभर अन्नही शाळेतील विद्यार्थी पक्ष्यांसाठी ठेवत आहेत. झाडाला बांधलेल्या प्लास्टिक डबकी संबंधित व्यक्ती नियमित पाणी टाकतो. यातून पक्ष्यांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे. माणसांबरोबरच प्राणी-पक्ष्यांसाठीही पाणी उपलब्ध करून देण्यासाठी विविध मंडळी पुढे येत आहेत. प्रत्येकाने दिवसातून थोडसं पाणी पक्षांसाठी खिडकीत ठेवायला हवं.अशी भावना व्यक्त होत आहे.
असतो. असे अनेक पक्षी मरतातही. त्यांना वाचवण्यासाठी अनेकांनी आपल्या घासातील
एक घास पक्षांसाठी ठेवावा अशी माहिती प्रगतशील शेतकरी सखाराम नामदेव चोपडे
(कोंडीवडे ना.मा) यांनी मावळ जनसंवादला माहिती दिली.
0 Comments