Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

सामाजिक बांधिलकी जपत कातकरी बांधवांना मोफत अन्नधान्य वाटप..!

मावळ जनसंवाद :-  
 महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना व्हायरसमुळे संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे, त्यामुळे हातावर पोट असणार्‍या अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत  एम.सी.आश्रम सेंट थॉमस स्कूल, कोळवाडी यांच्या वतीने गोवित्री ग्रामपंचायत हद्दीतील भाजगाव, कोळवाडी, वळवंती, वडवली, गोवित्री येथील कातकरी समाजातील तसेच इतर गरजू ४१ कुटुंबांना तसेच बाहेरच्या जिल्ह्यातून कामानिमित्त या परिसरात आलेल्या ९ कुटुंबांना जिवनावश्यक किराणा मालाचे वाटप करण्यात आले. वाटप केलेल्या कुटुंबांना आधार मिळाल्यामुळे त्यांनी सदर संस्थेचे मनापासून आभार मानले.
            यावेळी सदर संस्थेचे व्यवस्थापक नोबेल अब्राहम, मंडल अधिकारी माणिक साबळे, तलाठी सूर्यकांत राऊत, पोलिस पाटील नवनाथ जांभूळकर, पोलिस पाटील अनिल पडवळ, सरपंच भारती पानघले, उद्योजक अमोल शेवाळे, कोतवाल संजय कांबळे आदि ग्रामस्थ उपस्थित होते.



छायाचित्र :वळवंती येथे  कातकरी बांधवांना मोफत अन्नधान्य वाटप करताना ठिपलेला फोटो 

Post a Comment

0 Comments