Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

फिरोदिया इन्स्टिट्यूट ऑफ फिलॉसॉफी, कल्चर अँड हिस्ट्री व शासनाच्या वतीने गोरगरीब गरजूंना अन्नधान्य व शासकीय किट...!

मावळ जनसंवाद :-  
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला असल्याने  ग्रामीण भागातील नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मजूर कामगार तसेच हातावर पोट असणाऱ्या नागरिकांचे व मजुरांचे या काळात अत्यंत हाल होत आहेत. या परिस्थितीचे  गांभीर्य लक्षात घेत साई ग्रामपंचायत हद्दीतील पारवडी गावात नव्याने चालू झालेली फिरोदिया इन्स्टिट्यूट ऑफ फिलॉसॉफी, कल्चर अँड हिस्ट्री व शासनाच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुक्यातील साई, नानोली नामा, पारवडी, घोणशेत येथील ठाकर व  कातकरी वीटभट्टीवरील गोरगरीब मजुर अशा ९० गरजू लोकांना  शासकीय किट वाटप करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लहान मुलांच्या पालकांमध्ये मुलांच्या आरोग्याविषयी अधिक चिंतेचे वातावरण मोठ्या प्रमाणात खेडेगावात पाहायला मिळते.
         आपल्या मुलाला कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पालकांनी विशेष काळची घेणे गरजेचे आहे. कोरोना विषाणूला घाबरून न जाता वेळीच योग्य ती काळजी घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. सर्वात महत्वाचे म्हणजे वीस सेकंद हात स्वच्छ धुणे, यात हाताची मागील बाजू, बोटांमधल्या बेचकळ्या आणि नखांच्या खालील भाग स्वच्छ धुण्याचा सल्ला त्यांनी दिला. साबण आणि पाण्याने अथवा ‘हॅण्डरब’ने (अल्कोहोलयुक्त) हात व्यव्स्थित धुवावे असे सांगण्यात आले आहे.
           त्यावेळी उपस्थित असलेले अमर प्रेरणा ट्रस्ट मॅनेजमेंट डायरेक्टर धाडीवाल सर,साई ग्रामपंचायत ग्रामसेवक ढोले, घोणशेत तलाठी किरण जगताप सो. देवेंद्र पाटिल सर व त्याचे सर्व सहकारी मा.सरपंच मारुती काटकर, चेअरमन सोपान काटकर पाटील (नवजीवन नागरी सह पतसंस्था साते),अमोल पिंगळे, विठ्ठल काळोखे पाटील, गणेश गरुड,योगेश पिंगळे,साई ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी भाऊ काटकर सिताराम काटकर,संदीप पिंगळे, नितीन वाघुले,अमोल वाडेकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.




 छायाचित्र :   फिरोदिया इन्स्टिट्यूट ऑफ फिलॉसॉफी, कल्चर अँड हिस्ट्री  व  शासनाच्या संयुक्त      विद्यमाने ठाकर व कातकरी वीटभट्टीवरील गोरगरीब मजुरांना मोफत अन्नधान्य 
 कीट वाटप करताना  ठिपलेला फोटो 

Post a Comment

0 Comments