मावळ जनसंवाद :-
कोरोना रोगाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी जाहीर केल्यानंतर दि. ३१ मार्च रोजीचा पालखी सोहळा रद्द झाला. चार ते पाच जणांच्या उपस्थितीत पार पडला. याच दिवसापासून गावातील काही तरूणांनी कचरा मुक्त श्री.एकविरा देवस्थानचा संकल्प केला.सलग चोवीस दिवस तीस ते पस्तीस तरूण सकाळी साडेसहा ते दहा या वेळेत स्वेच्छेने ह्या स्वच्छता मोहिमेत स्वतःला व आपल्या मुळे इतरांना कोरोनाचा प्रादूर्भाव होणार नाही याची काळजी घेत सहभागी होत होते. ह्या तरुणांनी जवळपास चाळीस ते पन्नास ट्रक भरेल येवढा कचरा गोळा करून तो जाळून टाकला.
कचरा गोळा करतं असताना जवळपास दोन ट्रक भरतील एवढ्या दारूच्या मोकळ्या बाटल्या कचऱ्यात सापडल्या. फुटलेल्या बाटल्यांच्या काचा ही तरूण गोळा करत होते पण अनेकांना हाताला जखमा झाल्याने फुटलेल्या बाटल्या तरुणांनी न उचलण्याचा निर्णय घेतला. फुटलेल्या बाटल्यांच्या काचा जमा केल्या असत्या तर साधारण चार पाच ट्रक नक्की भरतील. त्यासाठी वेगळी मोहीम नक्की राबवण्यात येणार आहे असे सांगण्यात आले.
स्वच्छता मोहिमेचे आई एकविरा देवीचे आगरी कोळी व संपूर्ण महाराष्ट्रातील भक्त आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी गडावर येतील. तेव्हा त्यांचे मन प्रसन्न होईल असा विश्वास स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेले तरूण व्यक्त करीत आहे.
प्रशासनाने आई एकविरा देवीच्या गडाचा परिसरात कचरा न होऊन देता गड कसा स्वच्छ राहील याची काळजी घेण्याची गरज आहे.
प्रतिक्रिया:- तुम्ही आई एकविरा देवी च्या दर्शनासाठी आतुर झाला आहात तशीच आई एकविरा देवी सुद्धा तुमच्या भेटीसाठी आतुर झालेली असेल यात तिळमात्रही शंका नाही. म्हणून अजुन थोडे दिवस घरात राहून ह्या कोरोना ला हरवू या मग आई एकविरा देवीची आणि तुमची भेट नक्कीच लवकर होईल याची मला खात्री आहे अशी प्रतिक्रिया वेहरगावचे पोलीस पाटील अनिल पडवळ यांनी मावळ जनसंवाद दिली

0 Comments